बांगलादेशात रेल्वेचे तीन ट्रॅक का असतात?
मुंबई : (आशोक कुंभार ) आजपर्यंत तुम्ही अनेकदा ट्रेनने प्रवास केला असणार. मग तो प्रवास जवळचा असोत किंवा मग लांबचा. प्रवासादरम्यान तुम्ही अनेकदा रेल्वे ट्रॅक पाहिला असेल. आपल्या देशात रेल्वे ट्रॅकवर दोन ट्रॅक टाकले जातात, ज्यावरून ट्रेन धावते पण जर आम्ही तुम्हाला सांगितले की भारताचा शेजारी असा देश आहे, जिथे रेल्वे रुळावर दोन नाही तर तीन ट्रॅक टाकलेले आहेत. हो आपण पाहिलं असेल की भारतात ट्रेन चालण्यासाठी दोन ट्रॅक असतात. पण बांगलादेशमध्ये ट्रेन चालण्यासाठी चक्क ३ ट्रॅक असतात. मग असा प्रश्न उपस्थीत होतो की असं का?
येथे असं का केलं जातं? हा सगळा गेजचा खेळ आहे वास्तविक, कोणत्याही देशातील रेल्वे ट्रॅक गेजनुसार तयार केले जातात. तुमच्या लक्षात आले असेल की, आपल्या देशातही काही ठिकाणी रेल्वे रुंद आहेत तर काही ठिकाणी जास्त अरुंद आहेत. या कारणास्तव, त्यांना लहान आणि मोठे ट्रॅक बसवले जातात, पण यावरुन सगळ्याच प्रकारची ट्रेन चालू शकत नाही.
दुसरीकडे, जर आपण बांगलादेशबद्दल बोललो तर तेथे ड्युअल गेजचा वापर केला जातो, ज्यामुळे तीन ट्रॅकसह रेल्वे ट्रॅक वापरला जातो. बांगलादेशमध्ये सुरुवातीपासून ड्युअल गेजचा वापर केला जात नव्हता. हे तंत्रज्ञान नंतर आले. पूर्वी तेथे मीटरगेजचा वापर केला जात होता.
पण ब्रॉडगेजची गरज असताना मीटरगेज बदलण्याचा खर्च खूप जास्त होता. तसेच तेथील सरकारला देशभर पसरलेले मीटरगेज रेल्वेचे जाळे बंद करायचे नव्हते. अशा परिस्थितीत, तिथल्या सरकारने दुहेरी रेल्वे ट्रॅक बसवण्याचा निर्णय घेतला, यामुळे एकाच ट्रॅकवर दोन वेगवेगळ्या गेजच्या गाड्या चालवण्याचे काम करता येते . म्हणूनच त्याला मिश्र गेज असेही म्हणतात. हे दुहेरी गेज ब्रॉडगेज आणि मीटर गेज दोन्ही एकत्र करून तयार केले आहे. यामुळेच आज बांगलादेशात ब्रॉडगेज आणि मीटरगेज गाड्या एकाच ट्रॅकवरून धावतात.