अल्पवयीन मुलगी बनली गर्भवती; युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


धुळे : लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीचा विश्वास संपादन करण्यात आला. तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध आल्याने त्यातून ती गभर्वती झाली.
बाळाला जन्मही दिला, पण त्याचा मृत्यू झाला. ही घटना सप्टेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या काळात घडली. याप्रकरणी रविवारी धुळे तालुका पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल झाला.धुळे तालुका पोलिस ठाण्यात पीडित मुलीने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, गावातील एकाने मैत्री केली. आपले लग्न जमले असल्याचे सांगून विश्वास संपादन केला.

मैत्री वाढवत असताना वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. हे सर्व पीडितेच्या आणि संशयिताच्या घरी हा प्रकार घडत होता. सातत्याने ते वाढत गेल्याने यातून गर्भवती बनली. अल्पवयीन मुलगी गर्भवती बनल्याने गावात चर्चेला उधाण आले. हा प्रकार सप्टेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीत घडला. तिची तब्येत खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिने बाळाला जन्म दिला. पण, बाळाचे पुरेसे पोषण नसल्याने बाळाचा मृत्यू झाला.

याप्रकरणी पीडितेने धुळे तालुका पोलिस ठाण्यात रविवारी दुपारी साडेबारा वाजता फिर्याद दाखल केली. त्यानुसार, एका विरोधात भादंवि कलम ३७६ (२) (एन) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ५ (जे) (२) (एल), ६ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तालुका पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक आर. डी. पाटील घटनेचा तपास करीत आहेत.