ताज्या बातम्यामहाराष्ट्र
बेकायदा वास्तव्य करणाऱ्या १८ बांगलादेशी नागरिकांना अटक

मुंबई :देशात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या १० महिलांसह १८ बांगलादेशी नागरिकांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. नवी मुंबईतील घणसोली परिसरातील एका इमारतीत काही बांगलादेशी नागरिक लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी रात्री या इमारतीवर छापा टाकला. गेल्या वर्षभरापासून कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय या भागात राहणाऱ्या दहा महिला आणि आठ पुरुषांना अटक करण्यात आली आहे.
त्यांच्याविरोधात फॉरेनर्स अॅक्ट १९४६ आणि पासपोर्ट (भारतात प्रवेश) नियम १९५० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.