शासनाच्या विविध विभागात नोकर भरतीच्या वयोमर्यादेत वाढ!
महाराष्ट्र : (आशोक कुंभार ) शासनाच्या विविध विभागात नोकरभरतीसाठीच्या वयोमर्यादेत वाढ करण्यात आली आहे. नोकरभरतीच्या वयोमर्यादेत आता दोन वर्षांची वाढ करण्यात आली आहे. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत हा वयोमर्यादा वाढीचा निर्णय लागू राहीलराज्यशासनातील विविध विभागात ७५ हजार नोकर भरतीची घोषणा सरकारने केली होती. नोकरभरतीसाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाने त्या संदर्भातला परिपत्रक आज जारी केला आहे.
सरळलेवा भरतीया माध्यमातून शासनाच्या विविध विभागात भरती होत असते. यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे शासनाच्या विविध विभागातील ७५ हजार नोकरभरतीची षणा केली होती. दोन वर्षे कोरोनामध्ये गेले होते. स्पर्धा परिक्षा ही वेळवर होत नव्हती. यामुळे अनेक परिक्षार्थींची वयोमर्यादा उलटून गेली होती. उमेदवारांना संधी योग्यरित्या मिळाली नव्हती. त्यामुळे वयोमर्यादेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी पुढे येत होती.
या मागणीचा विचार करून ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागात नोकरभरती होणार आहे. या भरतीसाठी आता वयोमर्यादेत दोन वर्षांची वाढ करण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ३८ वर्ष अशी वयोमर्यादा होती, आता ती या निर्णयामुळे ४० वर्ष होणार आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४३ ऐवजी ४५ वर्षांची वयोमर्यादेत वाढ करण्यात आली आहे.