ताज्या बातम्या

7 जन्मांचा प्रवास 24 तासात संपला!


आग्रा : विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यात सर्वात मोठा आनंदाचा क्षण मानला जातो. मात्र, हा आनंद एका तरुणाच्या आयुष्यात औट घटकेचा ठरला आहे. आग्रा येथील एका लग्नाचा दुःखद अंत झाला.
लग्नाच्या अवघ्या 24 तासांनंतर वधूची अंत्ययात्रा सजवली गेली. लग्नानंतर नवरीला आपल्या हातात उचलून वराने घरी आणले. तिच्यासोबत 7 फेऱ्या मारल्या आणि सात जन्म त्च्यासोबत राहण्याचे वचन दिले. पण हे बंधन सात जन्मांचे नसून 24 तासांचे ठरले आहे.हे संपूर्ण प्रकरण फतेहपूर सिक्री परिसरातील महादेव गल्लीचे आहे. शहरातील रहिवासी असलेल्या राजूचा विवाह आग्रा येथील सोनियासोबत 26 फेब्रुवारी रोजी झाला होता. संपूर्ण घरात लग्नाचे वातावरण होते. सर्वजण आनंदी होते, पण नंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवशी वधूची प्रकृती खालावली.

वधूला भरतपूर येथील आरबीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यानंतर वधू सोनियाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर वऱ्हाडी मंडळीवर शोककळा पसरली. याची माहिती तिच्या माहेरी देण्यात आली.

माहिती मिळताच वधूचा भाऊ करण कुमार आणि इतरही फतेहपूर सिक्री येथे पोहोचले आणि पोलीस स्टेशनला सोनियाच्या अक्समात मृत्यूचे पत्र देण्यात आले. दुसरीकडे लग्नाच्या दुसऱ्या दिवशी वधूच्या मृत्यूची बाब नगरमध्ये चर्चेचा विषय ठरली. असे होईल असे वाटले नव्हते वर राजू सांगतो की, त्याने लग्नाची अनेक स्वप्ने पाहिली होती, पण असे होईल असे कधीच वाटले नव्हते. अचानक वधूची तब्येत बिघडली.

तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. वधू अनेक दिवसांपासून आजारी होती गेल्या अनेक दिवसांपासून नववधूची प्रकृती तिच्या माहेरी असतानाही अस्वस्थ होती. लग्नाची तारीख जवळ आली होती, म्हणूनच घरच्यांनी लग्न केलं. लग्नामुळे तिची तब्येत बिघडली. अखेर दुसऱ्या दिवशीच वधू सोनियाचा मृत्यू झाला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button