वणी बसस्थानक परीसरात अज्ञात युवकाचा खून

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


नाशिक : वणी बसस्थानकात डोक्यात व अंगावर दगड टाकून अनोळखी तरुणाचा अज्ञातांनी खुन केल्याची घटना घडल्याने वणी परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी की, वणी बसस्थानकात आज रात्री एक ते चार वाजेच्या सुमारास एका अनोळखी तरुणाच्या अज्ञात आरोपींनी डोक्यावर व अंगावर दगड टाकुन मारले. यानंतर बसस्थानकाच्या स्वच्छतागृहाच्या बाजुला असलेल्या मोकळ्या जागेत काटेरी झाडांच्या बाजुला ओढत नेउन टाकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

घटनेनंतर बसस्थानाकातील वाहतूक नियंत्रक कार्यालयाचा दरवाजा व खिडकीचे गज वाकवून आतमध्ये प्रवेश करीत आपण केलेले कृत्य सीसीटीव्ही कैद झाला असावा म्हणून आरोपींनी सीसीटीव्ही यंत्रणेस लावलेले इन्वर्टर काढून नेले.

मात्र डीव्हीआर तसाच राहील्याने घटनेचे रेकॉरडींग सदर डीव्हीआर मधून पोलिस हस्तगत करुन आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे. दरम्यान पोलिसांनी श्वान व ठसे तज्ञ पथकास पाचारण करुन आरोपीचा माग काढण्याचा प्रयत्न केला असून घटनास्थळावर दगड व अन्य वस्तूंवरील ठसे पथकाने घेतली आहे.

यावेळी श्वानाने वाहतूक नियंत्रक कार्यालय ते मृतदेह पडलेले ठिकाण व व नदी बाजूकडे जावून परत वाहतूक नियंत्रक कार्यालय असा माघ काढला. घटनास्थळी पेठचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती फडताळे यांनी भेट देवून पाहाणी केली आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत, पोलिस उपनिरीक्षक प्रविण उदे आदीसंह पोलिस करीत आहे.

Crime News : आधी चार बायका सोडून गेल्या; पाचवीने वैतागून प्रायव्हेट पार्ट कापला