ताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्टँपवेंडर तसेच दलालाकडून दस्त नोंदणीची कामे थांबवा


राळेगाव: तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालया स्टैंप वेंडर, दलाल तसेच एजेंट यांना कोणताही कायदेशिर अधिकार नसताना बेकायदेशिर रित्या दस्त नोंदणी केली जात आहे. हा प्रकार थांबविण्यात यावा, असे निवेदन वकील संघाच्या वतीने उपविभागीय अधिकार्‍यांना देण्यात आले आहे. संपत्तीचे व्यवहार करत असताना विशेषतः खरेदी, विक्री, मृत्यूपत्र बक्षिसपत्र व इतर दस्तऐवज मालमत्ता हस्तांतरण करतेवेळेस कायद्याच्या बाजू तपासून व कित्येक कायद्याच्या चौकोटीतून जाऊन दस्त बनवावा लागतो व नंतर दस्त नोंदणी केला जातो. साधारण कूटुंबातील व्यक्ती त्याच्या जिवनात एक किंवा दोन स्थावर मालमत्ता घेतो. त्यातही त्याला खूप काटकसर करावी लागते.



मालमत्ता विकत घेताना सर्व व्यवहार तपासून कायद्याचा अभ्यासकरून दस्त बनवला जातो व त्यानंतर तो नोंदणी केला जातो. तसे न झाल्यास त्याचे कधीही न भरून निघणारे नूकसान संभवते मात्र दुय्यम निबंधक कार्यालयात दलालच दस्तचे काम करीत आहे. Stamp Vendor स्टॅम्प वेंडर यांना स्टँप विक्री आणि रेव्हेनू तिकिट विक्री करण्याचा परवाना आहे. त्यांना दस्त तयार करणे त्यावर दस्त तयार करणार म्हणून सही करणे दस्त नोंदणीसाठी सादर करणे वगैरेचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. तसेच स्टँप विक्रेत्यांकडून होणारे कामकाज हे बेकायदेशीर आहे. या सर्व अनागोंदी कारभारामुळे खोटे, चूकीचे दस्त नोंदणी होऊन सामान्य जनतेची फसवणूक होऊन बरेच फौजदारी गुन्हे व दिवाणी वादाचे प्रमाण वाढले आहे.

खोटे व बनावट आधारकार्ड बनवून बोगस व्यवहार करून दस्त नोंदवीले जातात. दस्त लिहिणे व नोंदविण्यासाठी सादर करणे ही कायद्याची पदवी व सनदधारक व्यक्तींंमार्फतच होणे आवश्यक आहे. कोणतीही पदवी यासाठी ग्राह्य धरली जात नाही. हा प्रकार या आधीसूध्दा प्रशासनाच्या लक्षात आणून दिला होता. तरीही संबंधितांविरूद्ध प्रशासनाने आजपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही. सामान्य नागरिकांच्या होणार्‍या फसवणूकीस तसेच कायदेशिर त्रुटीस प्रशासन जबाबदार आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात स्टैंप वेंडरकडून, दलालामार्फत तसेच एजंटकडून होणारे सर्व व्यवहार बंद करावेत, त्यांच्याविरूध्द कायदेशिर कारवाई करावी. Stamp Vendor स्टैंप वेंडर, दलाल यांच्याकडून दुय्यम निबंधक कार्यालयात होणारे दस्त नोंदणी व सादरीकरणाचे काम बेकायदेशीर असून हा प्रकार न थांबल्यास राळेगाव तालुक्यातील वकिल तिव्र आंदोलन करतील असा इशारा दिला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button