ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

स्वत:ला राष्ट्रपती पदाचे उमेदवार समजणारे बिचुकले यांचा पुण्याच्या निवडणुकीत पराभव, इतक्या मतांवर मानवं लागलं समाधान


कसबा  : बिगबॉस फेम आणि स्वत:ला कवीमनाचा नेता म्हणवणारे अभिजीत बिचुकले हे इतर निवडणुकींप्रमाणेच कसब्याच्या पोटनिवडणुकीतही पॅड बांधून उतरले होते. मात्र त्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली आहे.
नुकताच कसब्यातील पोडनिवडणुकीचा निकाल हाती आला आहे. यामध्ये अभिजीत बिचुकले यांचा परभाव झाला आहे. त्यांना 47 मतांवर समाधान मानावे लागले आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर 11 हजार मतांनी विजयी पुण्यात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे.बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघामध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर 11 हजार मतांनी विजयी झाले आहेत. कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरूवात झाल. पोस्टल मतदानामध्ये काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आघाडी घेतली ती शेवटपर्यंत कायम राहिली.

मतमोजणीपासून धंगेकर यांनी आता 11 हजार 40 मतांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. मतमोजणीच्या 15 व्या फेरीनंतर धंगेकरांची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाले,…आजपर्यंत अनेक निवडणुका लढवल्या पण सगळ्यात अपयशी अभिजित बिचुकले यांनी आजपर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. मात्र एकाही निवडणुकीत त्यांना यश मिळालेलं नाही. पण निवडणुकीला उभं राहणं आणि प्रचाराच्या पद्धतीने ते कायम चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहेत.

‘महाराष्ट्राचा 2019 चा मुख्यमंत्री मीच ठरविणार..!’ अशा आशयाचे बॅनर साताऱ्यात पाहायाला मिळाले. त्यावर बिचुकले यांच्या अतिआत्मविश्वासाची खिल्ली उडवली गेली. सातारा पालिकेतील एक कर्मचारी, लोकसभा उमेदवारी ते ‘बिग बॉस-२’ पर्यंतचा त्यांचा प्रवास अनाकलनीय म्हणावा लागेल.

नगरसेवक ते खासदार निवडणूक लढवणारे अभिजित बिचुकले यांनी नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्राची अजूनही चर्चा होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपती पदासाठी पत्र लिहून ‘भारताचे राष्ट्रपती म्हणून तुम्ही माझेच नाव घोषित करावे,’ अशी विनंती केली होती. तर सांगली इथं पंतगराव कदम यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत विश्वजित कदम यांच्या बिनविरोध निवडीपेक्षाही विरोधी उमेदवार म्हणून बिचकुलेंच्या माघारीचीच चर्चा सर्वाधिक झाली. बिगबॉसमुळे नाव चर्चेत अभिजीत बिचुकले मराठी आणि हिंदी बिगबॉसमध्येही स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. हिंदी बिगबॉसमध्ये तर बिचुकलेनी थेट सलमान खानसोबतच पंगा घेतला होता. नगरसेवकापासून ते राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपर्यंत अभिजीत बिचुकले सगळ्याच निवडणुकीला उभे राहतात.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button