Social Viral Newsताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

खळबळजनक ! मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या, कुटुंबियांचा गंभीर आरोप…


खळबळजनक बातमी पुढे येतंय. राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केली. काल रात्री ही आत्महत्या केल्याची माहिती मिळतंय. आता मुलीचे घरचे वरळी पोलिस ठाण्यात पोहोचले असून ही आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा दावा त्यांच्याकडून केली जातंय.

 

आमच्या मुलीने आत्महत्या केली नाही तर तिची हत्या करण्यात आलीये… असा दावा कुटुंबियांनी पोलिसांसमोर केला. सध्या पोलिसांकडून या प्रकरणात तपास केला जात आहे. अनंत गर्जे मागील काही वर्षांपासून मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए म्हणून काम करतो. पंकजा मुंडे यांच्यासोबत तो कायमच असतो. काही महिन्यांपूर्वीच अनंत गर्जेचे लग्न झाल्याची माहिती मिळत आहे.

अनंत गर्जे याच्या लग्नाला स्वत: पंकजा मुंडे पोहोचल्या होत्या. लग्नाच्या अवघ्या काही दिवसात पत्नीने आत्महत्या करून जीवन संपल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी मुलीचे शव ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. कुटुंबिय मोठ्या संख्येने वरळी पोलिस ठाण्यात पोहोचले असून गंभीर आरोप करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणातील प्राथमिक तपास सुरू केला असून शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला.

 

शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर नक्की काय घडले हे स्पष्ट होईल. याबाबत अजून मंत्री पंकजा मुंडे यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. पंकजा मुंडे नेमके काय बोलतात याकडे सर्वांच्या नजरा आहेत. पंकजा मुंडे यांचा पीए म्हणून अनंत गर्जे मागील काही वर्षांपासून काम करतो. मात्र, या आत्महत्येनंतर आता विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.

पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे याच्यावर गुन्हा दाखल व्हावा, याकरिता मुलीचे कुटुंबिय आग्रही आहेत. या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांचे आजचे सर्व नियोजित दाैरे रद्द केल्याची माहिती मिळतंय. पोलिसांनी या प्रकरणात अजून गुन्हा दाखल करून घेतला नाहीये. तपास सध्या सुरू आहे. आत्महत्येचे कारन काय याचा शोध घेतला जातोय.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button