क्राईमताज्या बातम्या

हॉटेलमध्ये तरुणीला जबरदस्ती मद्य पाजून अत्याचार, तरुणावर गुन्हा दाखल


पुणे:विमाननगर परिसरातील एका हॉटेलमध्ये तरुणीला मद्य पाजून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस ( Pune) आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी एका 28 वर्षीय तरुणीने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभिषेक सत्तुजी टिक्कल (वय 28, रा. चंदननगर) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे. हा प्रकार जुलै 2022 मध्ये घडला.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,टिक्कल ने तरुणीला विमाननगर भागातील एका क्लबमध्ये पार्टीसाठी बोलावले होते. त्याने तिला जबरदस्तीने मद्य पाजले. तिला मद्याचा त्रास झाल्यामुळे त्याने नशेत तिला दुसऱ्या हॉटेलमध्ये नेले. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. तसेच, तिचे नग्न छायाचित्र सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देऊन पुन्हा तिच्यावर अत्याचार ( Pune) केले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button