दीड कोटी रुपयांच्या शर्टसाठी गोल्डमन दत्तात्रेय फुगे यांची दगडाने ठेचून हत्या
पुणे : (आशोक कुंभार )सुमारे 1.50 कोटींचा शर्ट घालून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या दत्तात्रेय फुगे यांची हत्या करण्यात आली होती. ‘गोल्डमॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या फुगे यांचा मृतदेह गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पुण्याजवळील दिघी परिसरातून सापडला.
याप्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे. चिटफंड घोटाळ्याशी या हत्येचा संबंध जोडून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दत्तात्रेय फुगे यांच्या पत्नी सीमा या पुण्याजवळील पिंपरी महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक आहेत. दत्तात्रेय स्वतः राजकारणात सक्रिय होते आणि चिटफंड व्यावसायिक देखील होते.
दरम्यान, शर्ट बनवल्यानंतर दत्ता फुगे यांच्या अडचणी वाढल्या. त्यांना चोर, गुंडाची भीती सुरु झाली. त्यासाठी २०-२० बॉडीगार्ड ठेवावे लागले. हे बॉडीगार्ड सतत त्यांच्या सोबत असायचे. दत्ता फुगे यांचा वक्रतुंड चिट फंड नावाने कंपनी बनवली होती. या कंपनीविरोधात आर्थिक घोटाळ्याच्या तक्रारी होत्या.