शिक्षण क्षेत्रात चंदुकाका जगताप यांनी शैक्षणिक क्रांती केली -प्रा.दीपक जांभळे
शिक्षण क्षेत्रात चंदुकाका जगताप यांनी शैक्षणिक क्रांती केली -प्रा.दीपक जांभळे सर
महाराष्ट्र : ( आशोक कुंभार ) न्यू इंग्लिश स्कुल जवळार्जुन विध्यालयात आज इयत्ता 10 वी च्या विध्यार्थ्याचा शुभ चिंतन सोहळा पार पडला
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिनजी टेकवडे , प्रमुख पाहुणे प्राध्यापक दीपक जांभळे सर प्रमुख पाहुणे म्हणून लाभले प्रमुख मान्यवर नवनाथजी राणे पत्रकार तसेच मोहन टेकवडे उपस्थित होते विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तमराव निगडे सर यांनी प्रास्ताविक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गोळे सर यांनी केले यावेळी ज्ञानगंगा या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले
प्रमुख पाहुणे प्राध्यापक दीपक जांभळे सरांचा सत्कार विध्यालयाचे मुख्याध्यापक उत्तमराव निगडे सर यांनी सत्कार केला,अध्यक्ष श्री सचिनजी टेकवडे व नवनाथजी राणे पत्रकार ,मोहन टेकवडे यांचा सत्कार केला.
मुख्याध्यापक उत्तमराव निगडे सर यांनी प्रास्ताविक केले.
इयत्ता 5 वी ते 9 वी च्या विध्यार्थ्यानी इयत्ता 10 वी च्या मुलांना बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादित करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
प्रमुख पाहुणे दीपक जांभळे सरांनी आपल्या भाषणात सांगितले विध्यार्थी हा आजच्या काळात ऑल राउंडर बनला पाहिजे जीवनात मोठे व्हायचे असेल तर आई वडील,गुरू यांचा आदर केला पाहिजे इयत्ता दहावीतील विध्यार्थीनीमध्ये मला जिजाऊ दिसत आहे माजी विद्यार्थी यांनी शाळेविषयी आपले नाते घट्ट ठेवले पाहिजे पूर्वीची पिढी व आजची पिढी यामध्ये खूपच अंतर पडत चालले आहे.फक्त दहा वर्षे खूप कष्ट करा मग बाकीचे वर्षे राजासारखे जगा,मुलांनी कोणत्या मालिका पहाव्यात काय आदर्श घ्यावा यासाठी पूजा आंतरवाड, अर्चनादेवी यांची माहिती सांगून कठीण परिस्थितीत यश संपादन करण्याचे आवाहन केले
जीवनामध्ये यश संपादन करायचे असेल तर नम्र व्हावे
शिक्षण महर्षी चंदूकाका जगताप यांनी पुरंदर हवेली सातारा या ठिकाणी शिक्षण व्यवस्था दिन दलित गोर गरीबांच्या मुलांसाठी खुल्या केल्या व मोफत शिक्षण,संगणिक शिक्षण देण्याचे बहुमूल्य कार्य केले त्याबद्दल धन्यवाद दिले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिनजी टेकवडे यांनी इसांगितले मन एकाग्र करून परीक्षेला सामोरे जा नवनाथजी टेकवडे यांनी शाळेचे वातावरण खूप आनंददायी व छान आहे याबद्दल शाळा व संस्थेचे अभिनंदन केले.
इयत्ता पाचवी ते नववी विध्यार्थी यांनी दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्या दिल्या त्यानंतर दहावी च्या सर्व विध्यार्थ्यानी शाळेविषयी मनोगत व्यक्त करून माझी शाळा कायमच आमच्या जीवनातील एक प्रेरक स्थान असेल असे म्हटले.