लक्ष्मण दिवटे यांच्या ‘उसवण’ कथासंग्रहाचे वर्धा येथे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन.
लक्ष्मण दिवटे यांच्या ‘उसवण’ कथासंग्रहाचे वर्धा येथे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन.
आष्टी। प्रतिनिधी
विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त विदर्भ साहित्य संघ आयोजित, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे शनिवार दि ४ फेब्रुवारी रोजी वर्धा येथील ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील “ग.त्र्य.माडखोलकर प्रकाशन मंच” या स्टेजवर. नवलेखक शासकीय अनुदानातून पायगुण प्रकाशन अमरावती तर्फे कथाकार लक्ष्मण दिवटे लिखित उसवण या कथासंग्रहाचे प्रकाशन, अखिल भारतीय साहित्य अकादमी, दिल्लीचे सदस्य प्रा.डाॅ.नरेंद्र पाठक (ठाणे), सुप्रसिद्ध साहित्यिक तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबईचे सदस्य विलास सिंदगीकर (लातूर), प्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड (मुंबई), ज्येष्ठ कथालेखक डॉ.सतिश तराळ (अमरावती), ज्येष्ठ कथाकार डॉ.अर्जुन व्हटकर (सोलापूर), संयोजक डॉ.राजेंद्र मुंडे (वर्धा) आणि कथासंग्रहाचे लेखक लक्ष्मण दिवटे (बीड), समन्वयक भाग्यश्री बनहट्टी (नागपूर)आदिंच्या शुभहस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.