क्राईमताज्या बातम्याबीडमहत्वाचेमहाराष्ट्र

बीड धारदार शस्त्रांनी वार करून आणि दगडाने ठेचून खून..


बीड : (आंबाजोगाई )शहरातील रविवार पेठ भागात एका तरुणाचा धारदार शस्त्रांनी वार करून आणि दगडाने ठेचून खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी (दि.९) सायंकाळी ६ वाजता घडली.

नयूम अली चाऊस उर्फ बिल्डर (वय ३७, रा. रविवार पेठ, अंबाजोगाई) असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. नयुम हा भाजी मंडीतील बिटावर कामाला होता. जमिनीच्या वादातून हा खून झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंदाजे ५ ते ६ हल्लेखोरांनी बोलण्याच्या बहाण्याने नयूम चाऊस यास घराबाहेर बोलावून घेतले. त्यानंतर बोलण्यात गुंतवून ठेऊन हल्लेखोरांनी तीक्ष्ण हत्यारांनी आणि दगडाने त्याच्यावर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नयूमचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर हल्लेखोरांनी घटनास्थळातून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक विनोद घोळवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. नयूम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठवण्या आला आहे. दरम्यान, हल्लेखोर परळी येथील असून जमिनीच्या वादातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. शहर पोलीस पुढील तपास करत असून त्यानंतरचा यामागचे खरे कारण समोर येणार आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नव्हता. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button