पुण्यातील सराईत गुन्हेगार सौरभ पवार व त्याच्या 2 साथीदारांवर ‘मोक्का’
पुणे : कामावरुन घरी जाणाऱ्या तरुणाला अडवून जबरदस्तीने पैसे काढून घेत असताना विरोध करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण केली.
तसेच त्याच्या मित्राच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून गंभीर जखमी केल्याची घटना वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या (Warje Malwadi Police Station) हद्दीत घडली होती. याप्रकरणी आरोपींवर आयपीसी 307,397,341,323,504,506,506 सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार सौरभ सुनिल पवार व त्याच्या इतर दोन साथीदारांवर पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr) यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई (MCOCA Action) Mokka केली आहे. पोलीस आयुक्तांनी आजपर्यंत 12 टोळ्यांवर ( News) कारवाई केली आहे.
टोळी प्रमुख सौरभ सुनिल पवार (वय-19 रा. गोसावी वस्ती, कर्वेनगर, पुणे), राहुल गणेश चव्हाण (वय-20 रा. कर्वेनगर, पुणे), कुमार हिरामण चव्हाण (वय-29 रा. मावळे आळी, कर्वेनगर, पुणे) यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यात आली आहे. ( News)
टोळी प्रमुख सौरभ पवार व त्याच्या इतर दोन साथीदारांनी संघटीत टोळी तयार करुन स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill), खंडणी (Extortion), जबरी चोरी, गंभीर दुखापत, नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करुन तोडफोड करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई (Preventive Action) करण्यात आली होती. मात्र, त्यांच्यात काहीच सुधारणा झाली नाही. त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे वारंवार केले आहेत.
वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मोक्का कलमाचा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस. हाके (Senior Police Inspector D.S. Hake) यांनी
पोलीस उपायुक्त परिमंडळ-3 सुहेल शर्मा (DCP Suhail Sharma) यांच्या मार्फत
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale) यांना सादर केला
होता. या प्रकरणाची छाननी करुन आरोपींवर मोक्का कारवाईचे आदेश दिले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा,
सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे (ACP Rukmini Galande) यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस. हाके, पोलीस निरीक्षक गुन्हे दत्ताराम बागवे
(Police Inspector Dattaram Bagwe), तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल
(PSI Manoj Bagal) व पोलीस अंमलदार यांच्या पथकाने केली.