रस्ता आठ दिवसांत दर्जेदार पद्धतीने करावा नसता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार – अशोक पोकळे
चिखली ते भवरवाडी रस्त्यावर लियर टाकण्यास अधिकाऱ्यासह गुत्तेदाराकडून टाळाटाळ
रस्ता आठ दिवसांत दर्जेदार पद्धतीने करावा नसता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार – अशोक पोकळे
आष्टी। प्रतिनिधी
गेली वर्षभरापासून सातत्याने बीडसांगवी घाटापासून ते भवरवाडी पर्यंत आष्टी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मनमानी कारभारामुळे संबंधित गुत्तेदराने हे लियर गायब केला होता मात्र या संबंधी तत्कालीन उपाभियंता जोवरेकर व साबळे यांनी वारंवार लवकरच लियर टाकण्यात येईल असे सांगितले होते मात्र अद्यापही या रस्त्यावर लियर टाकण्यात आला नसून तरी याकडे जिल्हाधिकारी बीड यांनी लक्ष देऊन या रस्त्यावरील गायब केलेल्या लियर टाकण्यासाठी संबतींना सूचना द्यावेत अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे..
तालुक्यातील बीडसांगवी घाटापासून ते भवरवाडी पर्यंत रस्त्यावर असणारा एक लियर संबंधित गुत्तेदार व तत्कालीन अधिकारी यांनी गायब केला होता मात्र यासंबंधीतात या लियर प्रकरणी अनेकांनी आवाज उठल्यानंतर तत्कालीन आष्टी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता जोरवेकर यांनी हा लियर लवकरच टाकण्यात येईल असे संबंधितास कळवले होते त्यानंतर शाखा अभियंता सौदागर सह तत्कालीन उपभियंता प्रभारी साबळे यांनी या लियर प्रकरणी संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथी पर्यंत टाकण्यात येईल असे सांगितले होते मात्र अद्याप पर्यंत ही संबंधित अधिकारी आणि गुत्तेदार यांनी हा लियर टाकला नसून हा लियर टाकण्यास टाळाटाळ करत असून यामुळे मात्र या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून या लिअर गायब प्रकरणी मात्र जिल्ह्यातील पालकमंत्रीसह कोणीच लक्ष या रस्त्याकडे देत नसून जिल्हाधिकारी बीड यांनी या रस्त्याची पाहणी करून सार्वजनिक बांधकाम आष्टी यांनी हा लियर नेमका का टाकला नाही याची चौकशी करून संबंधित गुत्तेदार व अधिकाऱ्यावर कारवाई करून हा लियर तात्काळ टाकण्यात यावा अशी मागणी या परिसरातील प्रवासी वर्गातून होत आहे.याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सानप यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे त्यांची बाजू मांडता आली नाही.
चिखली ते भवरवाडी हा रस्त्याचे काम आठ दिवसांत दर्जेदार पद्धतीने करावे नसता आष्टी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा चिंचाळा, राघापूर गावचे माजी सरपंच अशोक पोकळे यांनी दिला आहे.