पाकिस्तानपासून स्वातंत्र्य हवे आहे,विधानसभेत पीओकेसाठी 24 जागा राखीव,भारतीय राज्यघटनेनुसार अर्ज भरायचे असतात
कर्जाच्या गर्तेत दबलेल्या आणि निराधार पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) लोकांसाठी वीज सबसिडी रद्द करण्याची घोषणा केली आहे. एक अधिसूचना जारी करुन, शाहबाज शरीफ सरकारने तात्काळ प्रभावाने पीओकेमधील नागरिकांना दिलेली वीज सबसिडी समाप्त केली आहे.
यासह, पाकिस्तानच्या बेकायदेशीरपणे कब्जा केलेल्या भूभागाचे जुने कर दर रद्द करण्यात आले आहेत.
पाकव्याप्त काश्मीरसाठी मोठा निर्णय
पाकिस्तानच्या स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तान सरकार आगामी काळात पीओकेमधील लोकांसाठी आणखी काही कठोर निर्णय घेऊ शकते. ‘सियासत एडिट’च्या अहवालानुसार, पीओके (पाकव्याप्त काश्मीर) साठी एकतर्फी कराराच्या मसुद्याचा आढावा घेण्यात आला आहे. येथील जुने वीजदर रद्द केल्याने रहिवाशांवर कराचा बोजा वाढला आहे.
पीओकेमध्ये वीज इतकी महाग झाली आहे
पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार, पीओकेमधील लोकांवर पाकिस्तान सरकारच्या नव्या हल्ल्याअंतर्गत विजेच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. पाकिस्तानच्या बेकायदेशीरपणे व्यापलेल्या प्रदेशात पाण्यापासून वीज तयार केली जाते. त्यामुळे महसूल वाढवण्यासाठी पाकिस्तान सरकार PoK मध्ये Kesco टॅरिफ लादून इंधनाच्या किमतीत वाढ करत आहे. नवीन आदेश लागू झाल्यानंतर आता पीओकेमध्ये वीज 16 रुपये प्रति युनिटवरुन 22 रुपये प्रति युनिट होईल.
पीओकेच्या लोकांना पाकिस्तानपासून स्वातंत्र्य हवे आहे
पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य हवे आहे. पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओकेमधील लोक त्यांच्या स्वातंत्र्यासाठी भारताकडे मदत मागत आहेत. पीओकेच्या बाग, नीलम व्हॅली, गिलगिट बाल्टिस्तान (जीबी) येथील लोक पाकिस्तान सरकारच्या निर्णयावर नाराज आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, येथील नॅशनिलिस्ट इक्वॅलिटी पार्टीचे (एनईपी) अध्यक्ष प्रा. सज्जाद रझा म्हणाले की, ‘जम्मू-काश्मीर विधानसभेत पीओकेसाठी 24 जागा राखीव आहेत. जेव्हा जेव्हा तिथे निवडणुका होतात तेव्हा आम्हाला भारतीय राज्यघटनेनुसार अर्ज भरायचे असतात.
लंडनमध्ये हद्दपार झालेले प्रा. रझा म्हणाले की, ‘पाकिस्तानने बंदुकीच्या जोरावर पीओके ताब्यात घेतला. भारतानेही बंदुकीच्या जोरावर त्यांना येथून हाकलून द्यावे… कृपया आम्हाला वाचवा.’