जिजाऊ सारखा वारसा प्रत्येक आईने पुढे न्यावा – राजश्री पाटील
- जिजाऊ सारखा वारसा प्रत्येक आईने पुढे न्यावा. राजश्री पाटील
- माहेरवाशीन मुक्ताबाई रामराव काळे यांचा सांडस येथे हदय सत्कार.
हिंगोली (प्रतिनिधी) घरातील मुलांमुलींवर आईकडुन झालेले चांगले संस्कार हेच त्यांच्या जिवनाच्या जडन घडणीसाठी महत्वाचे ठरतात. जिजाऊ सारखा वारसा प्रत्येक आईने पुढे न्यावा. सामान्य कुटुंबातुन आलेल्या मुक्ताबाई रामराव काळे यांनी राजमाता जिजाऊ यांचे विचार आचरणात आणुन आपले कुटुंब घडविले असे मत गोदावरी समुहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांनी व्यक्तकेले. कळमनुरी तालुक्यातील सांडस येथील माहेरवाशीन असलेल्या मुक्ताबाई रामराव काळे यांना पुण्यात राजमात जिजाऊ आदर्श पालक पुरस्कर मिळाल्याबद्दल त्यांचा पती रामराव काळे यांच्यासह ग्रामपंचायत सांडस व गावकर्याच्या वतीने साडीचोळी देउन ह्रदय सत्कार करण्यात आला.या वेळी राजश्री पाटील बोलत होत्या.कार्यक्रमास पत्रकार संदिप काळे ,सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे ,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदिप बोंढारे,सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती शहारे , सांडसचे सरपंच भास्कर बलखंडे,उपसरपंच वनिता जाधव, ग्रामसेविका अरुणा गोरे, सदस्य कैलास निरगुडे,मंगेश बाभळे,संगिता जाधव,शफियाबी पठाण,सविता निरगुडे ,डॉ. अवधुत निरगुडे,भागवत निरगुडे,संगिता जाधव,चंद्रकांत निरगुडे, गणेश जाधव,मुकिंदराव होडबे,अरुण बलखंडे, डिगांबर जाधव यांची यावेळी उपस्थिती होती.यावेळी राजश्री पाटील पुढे म्हणाल्या की, मातृत्वाचा गौरव होणे गरजेचे आहे.ज्या कुटुंबात महीलांचा सन्मान होतो त्या कुटुंबात संस्कारक्षम पिढी घडण्याचे काम होते.प्रत्येक कुंटुबातील मुला मुलींवर मातृत्वाचे संस्कार महत्वाचे ठरतात.मात्र आजच्या परिस्थितीत आईकडुन मुलींना संस्कार देण्याचे काम होत असतांनाच मुलांचा विसर पडत चालला आहे.कतृत्वान मुलांचा गौरव होत असतांना आई वडीलांना होणारा आनंद अवर्णनीय आहे. संदिप काळे यांनी सांडस या गावातील अनेक आठवणीना उजाळा दिला.श्री मिनगीरे यांनी संदिप काळे यांच्या ‘ऑल इज वेल’ या पुस्तकामधील आईभोवती गुंफलेल्या प्रसंगाची आठवण करुन दिली . सरपंच भास्कर बलखंडे यांनी मुक्ताबाई काळे यांनी जिजाऊच्या विचारांचा आदर्श घेउन अतिशय प्रतीकुल परिस्थितीत आपले कुटुंब घडविले असल्याचे स्पष्ट करुन गावतील महीलांनी त्यांचा आदर्श घ्यावा व आपले पाल्यांना घडवावे असे आवाहन केले.पत्रकारितेच्या माध्यमातुन काळे यांनी युवक महिला आणि कामगारांच्या प्रंशनाची सोडवणुक करण्यासाठी आपली लेखणी झिजवली असल्याचे सांगितले. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
…….
फोटो ओळ
सांडस येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये मुक्ताबाई रामराव काळे यांचा मान्यवरांच्या हस्ते साडी चोळी देऊन ह्रदय सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास समाजसेविका गोदावरी बँक समूहाच्या प्रमुख राजेश्री पाटील, पत्रकार संदिप काळे ,सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे ,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदिप बोंढारे,सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती शहारे , सांडसचे सरपंच भास्कर बलखंडे,उपसरपंच वनिता जाधव, ग्रामसेविका अरुणा गोरे, आदींची उपस्थिती होती.
……