माजी कायदे मंत्री शांती भूषण यांचं वृद्धापकाळानं निधन
माजी कायदे मंत्री आणि वरिष्ठ वकील शांती भूषण यांचं वृद्धापकाळानं निधन झालं हे, ते ९७ वर्षांचे होते. दिल्ली येथील त्यांच्या राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Former Law Minister and Senior Advocate Shanti Bhushan passes away.
(File pic) pic.twitter.com/UY2irnYAx5
— ANI (@ANI) January 31, 2023
वरिष्ठ वकील आणि मानवाधिकार कार्यकर्ते अॅड. प्रशांत भूषण हे त्यांचे पुत्र आहेत.
अलाहाबाद हायकोर्टातील ‘राज नारायण’ या प्रसिद्ध खटल्यातील ते नारायण यांचे वकील होते. या खटल्यातील त्यांच्या युक्तिवादामुळं सन १९७४ मध्ये इंदिरा गांधी यांची खासदारकी रद्द झाली होती. तसेच त्यांना पुढील सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्यात आली होती. त्याचबरोबर त्यांनी अनेक जनहित याचिका दाखल केल्या होत्या. त्यानंतर भ्रष्टाचार आणि नागरी स्वातंत्र्यासाठी त्यांनी अनेक कायदेशीर लढाया दिल्या.
सन १९७७ ते १९७९ या दोन वर्षांच्या काळात त्यांनी तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात भारताचे कायदे मंत्री म्हणून काम पाहिलं. त्यानंतर १९८० मध्ये त्यांनी ‘सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन’ नावाची प्रसिद्ध एनजीओ स्थापन केली. या एनजीओच्या माध्यमातून त्यांनी अनेक महत्वाच्या जनहित याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केल्या.
सन २०१८ मध्ये त्यांनी वकिलांचं ‘मास्टर ऑफ रोस्टर’ ही व्यवस्था बदलण्यासाठी सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली होती. त्यांचे पुत्र वरिष्ठ विधीज्ञ आणि मानवाधिकार कार्यकर्ते प्रशांत भूषण हे प्रसिद्ध वकील आहेत.