कृषि कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला प्रारंभ
कृषि कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला प्रारंभ
आष्टी : आष्टी येथील श्री. छ. शा. फु. कृषी महाविद्यालय, आष्टी येथील मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागा अंतर्गत ‘कृषि कचरा व्यवस्थापन’ उत्पादन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थी पदवी शिक्षण घेत असताना त्यांच्यात उद्योजकता कौशल्य विकसित व्हावे, कृषी पूरक व्यवसायातील संधी, ताकत, कमकुवत बाजू व धोके त्यांना समजावेत तसेच कृषी शिक्षण घेणारा विद्यार्थी फक्त उत्पादक न बनता उद्योजक बनावा या उद्देशाने महाविद्यालयात हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. सदर प्रकल्प हा पदवीच्या अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थी राबवित आहेत. यामध्ये विद्यार्थी स्वतः गांडूळ खत उत्पादन करून त्याची विक्री करणार आहेत. सदरील प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यासाठी मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. एम. ए. आजबे यांच्या मार्गदर्शनाखाली अंतिम सत्राचे विद्यार्थी परिश्रम घेत आहेत. कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आर. आरसुळ यांनी देखील विद्यार्थ्याच्या कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला शुभेच्या दिल्या आहेत. सदर प्रकल्पाद्वारे कुशल व अकुशल युवक रोजगार निर्मित्ती होणार असल्याने आष्टी शहर व परिसरातील युवक व युवतींनी प्रकल्पास भेट देऊन तांत्रिक प्रशिक्षण घेऊन व्यवसाय सुरू करावा असे आवाहन प्राचार्य डॉ. एस. आर. आरसुळ व प्रकल्प प्रमुख डॉ. एम. ए. आजबे यांनी केले आहे.