किडनीचा काही प्रॉब्लेम असल्यास अशी लक्षणं लागोपाठ दिसतात
शरीरातील सर्व अशुद्धी बाहेर टाकण्याचं काम मूत्रपिंड अर्थात किडनी करते. आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी किडीनचं कार्य योग्य पद्धतीनं होणं गरजेचं असतं.
किडीनीचे विकार जडू नयेत, यासाठी योग्य काळजी घेणं महत्त्वाचं आहे. पण जेव्हा तुमची किडनी व्यवस्थित काम करत नाही, तेव्हा शरीरात अनेक प्रकारची लक्षणं दिसू लागतात. ही लक्षणं नेमकी कोणती आहेत, याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिलंय.
किडनी हा व्यक्तीच्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. रक्त स्वच्छ करण्यासोबतच किडनी शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्याचं काम करते. आज आम्ही तुम्हाला अशा काही लक्षणांबद्दल सांगणार आहोत, ज्यावरून तुम्हाला सहज कळेल की, तुमची किडनी निरोगी आहे किंवा नाही? चला जाणून घेऊया या लक्षणांबद्दल.
कोरडी त्वचा आरोग्य तज्ज्ञांच्या मते, किडनी अनेक महत्त्वाची कामं करते. ती आपल्या शरीरातील टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त द्रव काढून टाकण्याचं काम करते. या व्यतिरिक्त किडनी लाल रक्तपेशी तयार करण्यास, हाडे मजबूत ठेवण्यास आणि रक्तातील पोषक घटकांचे प्रमाण राखण्यास मदत करते. त्यामुळे त्वचा कोरडी पडणं आणि खाज येणं, हे किडनी निकामी होण्याचं लक्षण असू शकतं.
लघवीतून रक्त पडणं निरोगी किडनी शरीरातील रक्तपेशी टिकवून ठेवण्यास मदत करते, आणि लघवी तयार करताना रक्तातील टाकाऊ पदार्थ फिल्टर करते. पण जेव्हा किडनीचं फिल्टर खराब होते, तेव्हा लघवीमधून रक्त पडू लागते. घोटा आणि पायांना सूज येणे जेव्हा किडनी शरीरातून सोडियम योग्य प्रकारे बाहेर काढू शकत नाही, तेव्हा तुमच्या शरीरात जास्त प्रमाणात ते जमा होते. त्यामुळे हात, पाय, घोट्यावर किंवा चेहऱ्यावर सूज येऊ लागते.
तुम्हाला तुमचा पाय आणि घोट्यावर सूज दिसू शकते. तसेच, आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे की, सोडियम, कॅल्शियम, पोटॅशियम किंवा इतर इलेक्ट्रोलाइट्सच्या पातळीतील असंतुलन तुमच्या स्नायू आणि मज्जातंतूंच्या कार्यामध्ये व्यत्यय आणू शकतात, ज्यामुळे स्नायूंना क्रॅम्प्स आणि किडनीचे आजार होतात. लघवीमध्ये फेस तयार होणं बऱ्याचवेळा जेव्हा तुम्ही लघवी करता, तेव्हा थोडासा फेस तयार होतो. पण तो काही सेकंदात नाहीसा होतो.
परंतु जर तुमच्या लघवीमध्ये भरपूर फेस असेल, तर लघवीमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्याचा हा इशारा आहे. हे कोरोनाचा संसर्ग वाढल्यास डायबेटीस रुग्णांनी काय काळजी घ्यावी? जाणून घ्याखूप थकवा जाणवणं जर तुम्हाला एखादे लहान काम करतानाही थकवा जाणवत असेल, आणि तुम्ही संबंधित कामावर लक्ष केंद्रित करू शकत नसाल, तर हे एक वाईट लक्षण आहे. कारण जेव्हा किडनी नीट काम करू शकत नाही, तेव्हा रक्तामध्ये विष आणि घाण जमा होऊ लागते. यामुळे लोकांना थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. किडनी हा आपल्या शरिरातील महत्त्वाचा भाग असून त्याची काळजी घेणं महत्त्वाचा आहे.