ताज्या बातम्याबीडमहत्वाचेमहाराष्ट्र

जिल्हाधिकारी साहेब आंदोलन; बिंदुसरा नदीला सावत्र वागणूक दिल्याच्या निषेधार्थ – डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर


” संवर्धनासाठी जाणुन घ्या बिंदुसरानदीला जिल्हाधिकारी साहेब आंदोलन; बिंदुसरा नदीला सावत्र वागणूक दिल्याच्या निषेधार्थ:- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
___
जिल्हाधिकारी बीड राधाबिनोद शर्मा यांनी “नदीला जाणुन घेऊ या “अभियानाद्वारे शासन,प्रशासन व मानवलोकच्या माध्यमातून जिल्ह्य़ातील ५२ गावात जाऊन लोकांमध्ये नदीबाबत जनजागृती करणार आहेत परंतु गेल्या २ वर्षांपासून वारंवार निवेदन तसेच आंदोलनानंतर सुद्धा बिंदुसरा नदीपात्रातील अतिक्रमण तसेच अस्वच्छता यावाषयी जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्याबद्दल जिल्हाधिकारी यांच्या धोरणाच्या निषेधार्थ डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी ” संवर्धनासाठी बिंदुसरानदीला जाणुन घ्या जिल्हाधिकारी साहेब हे आंदोलन करण्यात असून याविषयी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्या मार्फत मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,पर्यावरण मंत्रालय यांना निवेदन देण्यात आले आहे.

सविस्तर माहीतीस्तव
__नदीबाबत लोकांमध्ये जनजागृती करणे नदी शुद्ध पाण्याचा स्तोत्र असून नदीशिवाय जीवन नाही नदीला वाचवण्याची गरज असून अतिक्रमण शोषण व प्रदुषण या ३ कारणांचा अभ्यास करण्यासाठी मांजरा नदीत अभियान राबवणारे जिल्हाधिकारी बीड बिंदुसरा नदीपात्रातील अतिक्रमण तसेच अस्वच्छता व दुषित पाणी याबद्दल जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असुन सावत्र वागणूक देत आहेत.

बिंदुसरा नदीपात्रातील अतिक्रमण व अस्वच्छतेबाबत “पोलखोल ” शोकसभा व क् श्रद्धांजली” तसेच लाॅलीपाॅप आंदोलन व “होडी आंदोलन आदि विविध लक्ष्यवेधी आंदोलने:- डाॅ.गणेश ढवळे
___
बिंदुसरा नदीपात्रातील अतिक्रमण तसेच अस्वच्छता व दुषित पाण्यामुळे नागरीकांच्या आरोग्यास धोका या संदर्भात दि.२९ नोव्हेंबर २०२१ रोजी “पोलखोल आंदोलन तसेच दि.२३ मे २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “नगरपरीषदेच्या मृतप्राय प्रशासनाच्या निषेधार्थ “शोकसभा व श्रद्धांजली आंदोलन तसेच दि.२७ जुन २०२२ रोजी “होडी आंदोलन ” तसेच दि.२५ जुलै २०२२ रोजी “लाॅलीपाॅप आंदोलन ” आदि आंदोलनानंतर सुद्धा जिल्हाधिकारी बीड व मुख्याधिकारी नगरपरिषद बीड यांच्यात सुधारणा झालीच नाही त्यामुळेच दि.०२ जानेवारी सोमवार रोजी बिंदुसरा नदीपात्रात लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात येणार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button