येथे मुलींना लग्नापूर्वी आई व्हावे लागते. आई झाल्यावरच मुलीचे लग्न केले जाते
भारतात प्रत्येक धर्माचे लोक राहतात. त्यामुळे त्यांच्या चाली-रीतीही वेगळ्या आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा ठिकाणाविषयी सांगणार आहोत, जिथे मुलींना लग्नाआधी आई व्हावं लागतं.
भारतातील पश्चिम बंगाल राज्यातील जलपाईगुडी येथील तुटोपाडा शहरात लग्नासाठी एका विचित्र प्रथेचे पालन करावे लागते. या प्रथेनुसार येथे मुलींना लग्नापूर्वी आई व्हावे लागते. आई झाल्यावरच मुलीचे लग्न केले जाते, अशी टोटू जमातीची परंपरा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येथे आधी मुलगा त्याच्या आवडीच्या मुलीला सोबत घेऊन जातो. त्यानंतर ते दोघे जवळपास एक वर्ष संबंध ठेवतात. दरम्यान, मुलगी गरोदर राहिल्यास ती लग्नासाठी योग्य असल्याचे सांगितले जाते. मुलगी गरोदर राहिल्यानंतरच तिचे लग्न होते. अशाप्रकारे तुटोपाडा शहरातील टोटू जमातीत लग्नाचे नियम काहीसे वेगळे आहेत.
त्याचप्रमाणे येथे घटस्फोटाचे नियमही विचित्र आहेत. येथे घटस्फोट घेण्यापूर्वी एक विशेष पूजा केली जाते, ज्यासाठी खूप खर्च येतो. यामुळे येथील लोकांना घटस्फोट होण्याची भीती आहे.