शिवसेनेच्या आंदोलनाला यश; नागरिकांच्या अनेक समस्या सुटल्या
शिवसेनेच्या आंदोलनाला यश; नागरिकांच्या अनेक समस्या सुटल्या
धारूर : संभाजीनगर,वडारवाडा,शिक्षक काॅलनी या भागातील विविध प्रश्नांसाठी शिवसेनेच्या वतीने दि.७/११/२२ रोजी आंदोलन करण्यात आले होते. हे आंदोलन १०/७/२२ रोजी लेखी आश्वासना नंतर स्थगित करण्यात आले होते.बाबासाहेब सराफ शिवसेना शहरप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले होते.यामध्ये: घंटागाडी,पाणी पुरवठा असे अनेक प्रश्नांसाठी शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते.
पावसाळ्यात गटारे तुंबणे, रस्त्यांची दुरावस्था, पाणी पुरवठा खंडीत होणे यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली होती.याप्रकरणी नागरिकांच्या विनंतीनंतर शिवसेनेचे शहरप्रमुख बाबासाहेब सराफ यांनी आंदोलनाचा इशारा देताचं नागरिकांच्या समस्यांकडे ग्रामपंचायत, पंचायत समिती प्रशासन यांनी लक्ष केंद्रित केले.कचऱ्याचा रस्त्यावर खच पडत असुन नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.यावेळी कचरा कुंडी घंटागाडी नसल्याने कचरा हे घंटागाडी नसल्याने कचरा रस्त्यावर बाहेर साचत होत. घंटा गाडी नसल्याने आणि कचरा टाकण्यासाठी कुठलीही कचराकुंडी उपलब्ध नसल्या कारणाने नागरिक कंटाळून कचरा हे रस्त्यावर फेकून देतात होते. कचरा रस्त्यावर फेकल्या कारणाने भागाची परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरते नागरिकांना रस्त्यावर चालताना नाका-तोंडावर रुमाल पकडावा लागतो होता. त्यामुळे या भागात डासांचे प्रमाण वाढले असून नागरिकांना डेंग्यू मलेरिया सारखे आजार होण्याची शक्यता बळावली होती. यासर्व बाबी लक्षात घेऊन शिवसेना आक्रमक झाली आहे.
त्यामुळे ग्रामपंचायत, पंचायत समिती प्रशासनाने लक्ष देऊन घंटागाडी नागरिकांसाठी सोय केली. भागातील नागरिक कचरा टाकण्याचा प्रश्न आज मार्गी लागला. तर यावर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून गांभीर्याने दखल न घेतल्यास किंवा दुर्लक्ष केल्यास सदर आंदोलन तीव्र स्वरूपाच करण्यात येणार असलेचं करण्यात येईल असा इशारा ही आंदोलन वेळी बाबासाहेब सराफ शिवसेना शहरप्रमुख यांनी दिला होता.यामध्ये आंदोलन कर्ते विशाल नडगीरे, अमोल सिरसट,मोनू शेख ,बबलू शेख, सलिम सय्यद, यांच नागरिकांकडून शब्बाशकीची थाप पडली आहे.