ताज्या बातम्यामहत्वाचे

ज्येष्ठांनो सोशल मीडियापासून सावध रहा!!! महिलेने केला शिवीगाळ.त्यानंतर…


त्यादिवशी काकांची नेहमीप्रमाणे त्यांचं फेसबुक उघडलं आणि मेसेंजरवर गेले. काल एका अनोळखी स्त्रीच्या प्रोफाईलवर त्यांनी हॅलो म्हणून मेसेज टाकलेला होता.त्यावर काय रिप्लाय आलाय हे जाणून घेण्यासाठी काका त्या मेसेजबॉक्समध्ये गेले आणि हादरलेच. त्या स्त्रीने काकांना यथेच्छ शिविगाळ केलेली होती. ते लंपट आहेत, आणि बायकांना इनबॉक्समध्ये हाय हॅलो करून त्रास देतात असं प्रचंड काय काय धमकी वजा लिहिलेलं होतं. आपलं नेमकं काय चुकलं आणि हॅलोचा पंजा असलेला इमोजी टाकला तर इतकं काय झालं हे त्यांना समजेना. सोशल मीडियावरून नवीन ओळखी होतात, मैत्री होते, समविचारी लोकांशी कनेक्ट होता येतं असं काय काय त्यांनी ऐकलेलं होतं. या बाई आणि त्यांच्यात अनेक कॉमन फ्रेंड्स होते. त्यामुळे या बाईंशी ओळख करून घ्यावी इतक्याच हेतूनेही त्यांनी हॅलो चा पिवळा पंजा मेसेंजरमध्ये टाकलेला होता. पण समोरच्या बाईंचा अनोळखी पुरुषांबद्दलचा अनुभव कदाचित वाईट असल्यामुळे असेल पण त्यांनी काकांच्या मेसेजचा पूर्णतः चुकीचा अर्थ काढला आणि काकांना धारेवर धरलं. घाबरलेल्या काकांनी मुलांशी बोलून लगेच बाईंना ब्लॉक करून टाकलं आणि अनोळखी माणसांशी कनेक्ट नको की मैत्री नको असा निष्कर्ष काढला. ऑनलाईन जगात निर्माण होणाऱ्या नात्यांमधला गोंधळ फक्त टिनेजर्स, तरुण आणि मध्यमवयीन स्त्रीपुरुषांच्या आयुष्यात असतो असं नाही तर पन्नाशी ओलांडलेल्या आणि जेष्ठ नागरिकांच्या आयुष्यातही उलथापालथ होऊ शकते.

 

अनेक वयानं मोठ्या असलेल्या स्त्री पुरुषांना हे माध्यम सोयीचं वाटत, वापरायला आवडतही, आपण समकालीन आहोत, जगाच्या प्रवाहाबरोबर जाणारे आहोत याचा आनंदही होत असतो त्यांना, पण जे मी नेहमीच म्हणत आले आहे तेच परत एकदा लिहिते, आपल्याला तंत्रज्ञान वापरता यायला लागलं आहे, माध्यम अजूनही आपण वापरायला पुरेसं शिकलेलो नाही. आणि मोठी माणसं तर याबाबत बाल्यावस्थेतच असतात. माध्यम वापरायला शिकलेलो नाही म्हणजे काय हे थोडं सांगते.

चॅटिंगमध्ये वापरल्या जगणाऱ्या भाषेचा, इमोजीचा अनेकदा थेट अर्थ अनेकांना माहित नसतो. अंदाजपंचे ठाऊक असतं आणि त्याबळावर बेधडक चुकीच्या गोष्टी चुकीच्या ठिकाणी वापरल्या जातात. उदा. फेसबुक आणि व्हॉट्सअपवर उपलब्ध असलेले बदाम. कशाला बदाम द्यावा, कशाला देऊ नये याचा विचारच आपण अनेकदा करत नाही, कुणालाही, कुठेही, कसल्याही पोस्टवर बदाम वाटण्याची सवय अनेक ज्येष्ठांना असते आणि त्यातून अगणित गैरसमज जन्मला येऊ शकतात.

 

आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणारा प्रत्येकजण हा जेन्युईन आहे, खरा आहे असं मानून चालायचं नाही. अनेकदा अनेक मोठी माणसं समोरची व्यक्ती खरी आहे असं मानून चालतात. विश्वास टाकतात आणि फसवले जातात. ही फसवणूक बहुतेकदा आर्थिक असते पण त्यातून होणारा मानसिक त्रास ना मोजता येणारा आणि भरून काढता न येणारा अनेकदा असतो.

 

ऑनलाईन जग अद्भुत आहे, जादुई आहे, त्याचा पुरेपूर वापर करून घ्यायचा तर जागतं आणि सजग असायलाच हवं. त्या जगात वावरताना वयाचा अडथळा येता कामा नये, त्याचप्रमाणे कुठल्याही जाळ्यात अडकताही कामा नये. यासाठी,

  • विचार करा, जागते राहा.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button