दारूच्या नशेत घरातील पत्र्याच्या शेडला गळफास घेऊन अत्म्हत्या
दारूच्या व्यसनाने अनेकांचे आयुष्य उद्धवस्त केल्याचा घटना नेहमीच समोर येत असतात. आता असाच काही प्रकार औरंगाबादच्या मुकुंदवाडी परिसरात समोर आला आहे.
दारूच्या नशेत एका वृध्द कापुस व्यापाऱ्याने गळफास घेउन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी रात्री मुकुंदवाडी परिसरातील संघर्षनगर येथे उघडकीस आली. उत्तम हरी करडे (वय 75) असे आत्महत्या करणाऱ्या व्यापाऱ्याचे नाव आहे. तर याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तम करडे कापसाचा व्यापार करीत होते. मात्र त्यांचे वय झाल्याने त्यांची दोन मुले हे व्यापार पहात होते. तर उत्तम करडे हे सध्या घरीच राहत होते. दरम्यान गेल्या काही दिवसांपासुन त्यांना दारूचे व्यसन जडले होते. त्यामुळे ते सतत नशेत राहत असत. त्यातुनच शनिवारी सायंकाळी त्यांनी घरातील पत्र्याच्या शेड मधील लोखंडी पाईल उपरणे बांधून गळफास घेतला, असल्याचे समोर आले आहे.
✍️✍️हे ही वाचा
लोकशाही न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन
नवगण न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !
डॉक्टरांनी मृत घोषित केले
करडे नेहमीप्रमाणे घरीच होते. तर रात्री शनिवारी सायंकाळी दारूच्या नशेत असतानाच त्यांनी घरातील पत्र्याच्या शेडला गळफास घेऊन अत्म्हत्या केली. हा प्रकार रात्री कुटुंबियांच्या लक्षात आल्याने त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना फासावरून उतरवून बेशुध्द अवस्थेत घाटी रूग्णालयात आणले. मात्र रात्री पावणे बारा वाजता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.