सावित्रीज्योती सन्मान २०२२ च्या पुरस्कारांचे दिमाखात वितरण
–सावित्रीज्योती सन्मान २०२२ च्या पुरस्कारांचे दिमाखात वितरण-
नाशिक : निर्वाण फाऊंडेशन, नाशिक यांच्या वतीने दिले जाणारे सावित्रीज्योती सन्मान २०२२ च्या सावित्रीज्योती राज्यस्तरीय पुरस्कार व क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले जीवनगौरव पुरस्कारांचा वितरण सोहळा काल रोटरी कम्युनिटी हॉल, नाशिक येथे येथे दिमाखात पार पडला.
लोकशाही न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
महारष्ट्रातील कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून आपली ओळख निर्माण करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात आले.
दीपप्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते ज्योतिबा फुले व सावित्रीमाईंच्या प्रतिमापूजन करण्यात आले. विचारमंचावर प्रमुख पाहुणे म्हणून मा. कितानो अर्बिस्ता डझा (सामाजिक कार्यकर्ते, पश्चिम आफ्रिका), मा. गॅब्रिएल लोपेस दा सिल्वा (स्कॉलर, पश्चिम आफ्रिका), मा. डॉ.एम.बी.देशमुख (जिल्हा क्षयरोग अधिकारी, नाशिक), अभिनेता प्रशांत गरुड, अभिनेत्री पल्लवी पटवर्धन तसेच संस्थेचे अध्यक्ष मा.निलेश आंबेडकर, संस्थेचे उपाध्यक्ष मा.सचिन धारणकर, संस्थेचे सचिव मा.राहुल सोनावणे व संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन
समाजातील अगदी शेवटच्या माणसाचा आणि त्याच्या कामाचा सत्कार होणे गरजेचे आहे, आणि हेच काम निर्वाण फौंडेशन करत आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एम.बी. देशमुख यांनी केले. निर्वाण फाउंडेशन ही महाराष्ट्रातील संस्था गेल्या १० वर्षांपासून सामजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात काम करत असून याच माध्यमातून संस्था वृद्धांसाठी व गतिमंदांसाठी राजगृह नावाने एक निवासी केंद्र चालवत आहे. संस्थेचे अध्यक्ष निलेश आंबेडकर यांनी यावेळी सांगितले की, ‘पुरस्कारातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळते’, त्यामुळेच या पुरस्कार सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बाल गायिका ज्ञानेश्वरी जमधाडे हिने ज्योतिबा फुले लिखित अखंडाचे गायन केले, तर तनमय दोंदे यांनी आपल्या गीतातून फुले आणि सावित्रीमाई यांना अभिवादन केले. तसेच शाहीर डॉ.देवानंद माळी, शाहिरा कल्पना माळी आणि त्यांचा संच यांनी आपल्या पोवाड्यातून सर्वांना मंत्रमुग्ध केले. याच कार्यक्रमात “नाशिक प्राईम न्यूज” या ऑनलाईन पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले.
नवगण न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !
कार्याक्रमचे सूत्रसंचालन संस्थेच्या पदाधिकारी मा.तक्षशीला सोनावणे व मा.तिलोत्तमा बाविस्कर यांनी केले, तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघमित्रा सोनावणे, श्रेया दोंदे, संचिता शेवाळे, राहुल बनसोडे, निर्मिती सोनावणे, अक्षय जाधव व संस्थेचे सर्व पदाधिकारी व सभासद यांनी प्रयत्न केले.
“समाज हा चांगल्या व्यक्तींच्या गुणांवर आणि कर्तुत्वावर समतोल साधत असतो. निस्वार्थी भावनेने समाजात काम करत असलेल्या मान्यवरांना दरवर्षी संस्था सावित्रीज्योती सन्मान या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो”
-निलेश आंबेडकर, अध्यक्ष, निर्वाण फाऊंडेशन