बिंदुसरा-करपरा नदीपात्रात अतिक्रमण धारकाचा धुमाकूळ थांबेल का?एस.एच.महाजन यांना डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर व शेख युनुस च-हाटकर यांनी प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर
बिंदुसरा-करपरा नदीपात्रातील अतिक्रमणे काढण्यात यावीत तसे पत्र बीड नगरपरिषद प्रशासनाला लिहावे अशी विनंती एस.एच.महाजन यांना डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर व शेख युनुस च-हाटकर यांनी प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली.
नगरपरिषदेची दादागिरी हातगाडे,टपरीधारक गोरगरीबांवर; भुमाफियांच्या बाबतीत मुग गिळुन गप्पच निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “झुणका भाकर दिवाळी आंदोलन:- डाॅ.गणेश ढवळे
____
बीड : नगरपरिषद प्रशासनाने ऐन दिवाळीच्या तोंडावर शहरातील नगररोड भागातील छत्रपती शिवाजीमहाराज चौक ते नगरनाका परीसरातील रस्त्याच्या कडेला असलेले हातावर पोट भरणारे हातगाडीवाले,टपरीधारक,छोटे व्यावसायिक यांचे अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त केले चहाच्या,पानाच्या टप-या,हातगाड्या वरील लहान हाॅटेल उद्ध्वस्त करत ऐन दिवाळीत हातावर पोट भरणा-या लहान व्यावसायिकांवर संक्रांत आणली. मात्र हेच जिल्हाप्रशासन व नगरपरिषद प्रशासन धनदांडग्या भुमाफियांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवत नसुन मुग गिळुन गप्पच आहे. याच्या निषेधार्थ आज दिनांक.२४ ऑक्टोबर सोमवार रोजी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली “झुणका भाकर दिवाळी आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “झुणका भाकर खात नगरपरिषद प्रशासनाच्या दुटप्पी धोरणाचा निषेध करण्यात आला.निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना देण्यात आले. यावेळी आंदोलनात शेख युनुस च-हाटकर,शेख मुस्ताक,धनंजय सानप,गणेश होडशिळ, शेख अकबर,कैफ शेख, सिद्धार्थ जगताप आदि सहभागी होते.
बाजारपेठा-शासकीय ईमारती,तसेच बिंदुसरा-करपरा नदीपात्रातील अतिक्रमण धारकांवर कारवाई कधी?
____
बीड शहरातील प्रमुख बाजारपेठा,अनेक सरकारी कार्यालयांच्या ईमारती अतिक्रमणाच्या विळख्यात असून आरोग्य विभागाची मोक्याच्या जागेवरील जिल्हाप्रशिक्षण केंद्राच्या ईमारतीची संरक्षक भिंत तोडून अतिक्रमणे झालेली असून एसटी महामंडळाची मोक्याची जागाही अतिक्रमणाच्या विळख्यात आहे. सुभाष रोडवर अतिक्रमण करून व्यावसायिक पेठच उभारली असून रहदारीस अडथळा येत असून न्यायालयात प्रकरण असल्याचे दाखवून अतिक्रमित दुकानदार महिन्याकाठी २० हजाराचे भाडे दुकानदारांकडून वसुल करतात नविन भाजीमंडीत देखील तात्पुरत्या अतिक्रमणामुळे वाहतूक व रहदारीस अडथळा होत असून याठीकाणी कारवाईची गरज आहे.
शहरातील तसेच बिंदुसरा-करपरा
बीड शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे,शहरात ठिकठिकाणी बेकायदा होडींग लागलेल्या असून त्यामुळे अनेकवेळा अपघात होतात तसेच बिंदुसरा-करपरा नदीपात्रातील अनाधिकृत बांधकाम प्रकरणात जिल्हाप्रशासन व नगरपरिषद प्रशासन वारंवार निवेदन देऊन तसेच आंदोलनानंतर सुद्धा कारवाई करत नसुन संबधित प्रकरणात कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
एस.एच.महाजन जिल्हा सत्र न्यायाधीश यांना प्रत्यक्ष भेटून विनंती
____
बीड नगररोड वरील अतिक्रमणे बीड नगरपरिषदेने जिल्हा सत्र न्यायाधीश एच.एस.महाजन यांच्या विनंतीवरून काढल्यामुळे बीड शहरातील ईतर शासकीय जागेवरील तसेच बिंदुसरा-करपरा नदीपात्रातील अतिक्रमणे काढण्यात यावीत तसे पत्र बीड नगरपरिषद प्रशासनाला लिहावे अशी विनंती एस.एच.महाजन यांना डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर व शेख युनुस च-हाटकर यांनी प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली.
डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२