वाढदिवसा निमित्त गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
वाढदिवसा निमित्त गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
आष्टी : पत्रकार अविनाश कदम यांच्या दरवर्षी वाढदिवस सामाजिक उपक्रमाने आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून हजारो रुपयांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी सध्याची पिढी हजारो रुपये अनर्थ उडवताना दिसत आहे.पण याला अपवाद आहेत.ते अध्यक्ष अविनाश कदम वाढदिवसाच्या अनर्थ खर्चाला फाटा देत गोरगरीब अनाथ निराधार विद्यार्थ्यां शालेय साहित्य व खाऊचे वाटप करून वाढदिवस साजरा केला त्यांच्या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आष्टी येथील विकास मस्के यांच्या नवजिवन संगोपन केंद्रातील गोरगरीब अनाथ निराधार विद्यार्थ्यांची शिक्षण क्षेत्रात मदत व्हावी फुल ना फुलाची पाकळी का होईना समजाचे आपण काहितरी देणे लागतो या सामाजिक भावनेतून अविनाश कदम यांनी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करुन विद्यार्थ्यांसमवेत बालगृहात वाढदिवस साजरा केला त्याच्या सामाजिक कार्याने इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे.वाढदिवसाचा अनर्थ खर्च टाळून गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत केल्याचा वेगळाच आनंद मिळतो असे अविनाश कदम यांनी सांगितले. यावेळी नवजीवन संगोपन केंद्राचे संचालक विकास मस्के यांनी आभार मानले.या कार्यक्रमास पत्रकार निसार शेख, जावेद पठाण, आण्णासाहेब साबळे, संतोष नागरगोजे, अक्षय विधाते, संदिप जाधव,प्रेम पवळ, तुकाराम भवर, अमोल जगताप, राजेंद्र लाड,सुभम लांडगे आदी उपस्थित होते.वाढदिवसानिमित्त राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, पत्रकार आदी क्षेत्रांतील मान्यवरांनी व मित्र परिवार यांनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, भ्रमणध्वनी, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला.