बीड संभाजीराजे हे पावसामुळे पडलेले सोयाबीन घेऊन जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात दाखल
बीड जिल्ह्यातल्या अतिवृष्टीची पाहणी करून जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांची भेट घेतली.माजी खासदार संभाजीराजे हे पावसामुळे पडलेले सोयाबीन घेऊन जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे फक्त सोयाबीन, कापूस या पिकालाच फटका बसला नाही तर फळबागांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. चार दिवस पडलेल्या पावसामुळे गेवराई तालुक्यातील मोसंबीच्या फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. तोडणीला आलेल्या मोसंबीच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ झाली असून शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. जास्तीच्या पावसामुळे सोयाबीन आणि कापसाचं तर नुकसान झालेच पण फळबागा देखील या पावसामुळे उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे फळबागांचे देखील पंचनामे करुन या नुकसानीची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
बीड : बीड जिल्ह्यात मागील आठ ते दहा दिवसात झालेल्या सततच्या पावसाने शेतकर्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन आणि कापसाचे पिक वाहून गेले.
नुकसानीची पाहणी करण्यासाठी यावेळी संभाजीराजे थेट बांधावर पोहोचले. यावेळी त्यांनी नुकसानीची पाहणी केली. मी राजवाडा सोडून शेतकर्यांसाठी त्यांच्या बांधावर आलोय, अशा भावना संभाजीराजेंनी व्यक्त केल्या. तसेच, एनडीआरएफ आणि एसआरएफच्या विशेष बाबीमधून बीड जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी तात्काळ मदत जाहीर करा, अशी यावेळी सरकारकडे त्यांनी मागणी केली.
संभाजीराजे म्हणाले की, परतीच्या पाऊसामूळे शेतकर्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यात गेल्या ५ दिवसांतमध्ये ८ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात महिला शेतकरी व युवा शेतकर्यांचाही समावेश आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे पंचनाम्यांमध्ये वेळ न घालता दिवाळीच्या अगोदर विशेष बाब म्हणून सरसकट १०० टक्के पीकविमा मंजुर करण्यात येण्यासाठी प्रशासकीय पातळीवर आदेश काढावा, याविषयी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली, असेही ते म्हणाले.