बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करा…
बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करा भारतीय महाक्रांती सेना प्रतिनिधी बीड चालू वर्षी सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकरी वर्गाने कापूस सोयाबीन उडीद मूग आधी पिकांचे मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे पिकांची वाढ होत असताना अचानक ऑगस्ट महिन्यात पाऊस न पडल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला मध्यंतरी सोयाबीनवर रोगांचा प्रादुर्भाव झाला पिकांची आणेवारी कमी दिसत असतानाही अग्रीम पिक विमा कंपनी देण्यास तयार नाही आता तर संपूर्ण बीड जिल्ह्यात परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने सोयाबीन कापूस पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे शेतकरी अक्षरशः हवालदिल झालेला आहे खते बी बियाण्याचा खर्च देखील शेतकऱ्यांचा निघाला नाही तरी शेतकऱ्यावर आलेल्या अस्मानी संकटाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना आधार म्हणून शासनाने लवकरात लवकर मदत जाहीर करावी आणि मदत जाहीर करताना कुठल्याही प्रकारचा पंचनामाचा फॉर्स न करता सरसकट अतिवृष्टी आणि पीक विम्याचे नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भारतीय महाक्रांती सेना बीड जिल्हा प्रमुख तथा मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे नेते माननीय आशिष अण्णा देशमुख यांनी केली आहे