संसदेच्या स्थायी समितीच्या बदलांमध्ये शिंदे गटाला महत्त्वाचे स्थान
शिवसेनेत बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. केंद्रात भाजपसोबत आल्या नंतर शिंदे गटाला मोदी सरकार पहिलं गिफ्ट दिलं आहे.
संसदेच्या स्थायी समितीच्या बदलांमध्ये शिंदे गटाला महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. माहिती-तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे देण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव हे ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात सामील झाले. शिंदे गटात सामील झाल्यानंतर प्रतापराव जाधव यांनी थेट ठाकरे यांना टार्गेट करत 100 खोके मातोश्री ok असं म्हणत खळबळ माजवून दिली होती.
एकनाथ शिंदे यांचे अतिशय विश्वासू असलेले प्रतापराव यांना आता भाजपकडून मोदी सरकार मध्ये पहिलं गिफ्ट देण्यात आलं. माहिती-तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद कायम चर्चेत असलेले समितीचे अध्यक्षपद प्रतापराव जाधव यांना देण्यात आलं आहे. याआधी काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्याकडे हा पदभार होता.
मात्र आता मोदी सरकारने बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर ती जबाबदारी दिली आहे.