ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

पिसेगाव बोगस रस्ता कामांची तक्रार जिल्हा परिषद कडून गटविकास अधिकारी यांना चौकशीचे आदेश


पिसेगाव ते कोंडूळवस्ती रस्ता हा मंजूर असल्याने पुन्हा शासनाने दिलेल्या अटी शर्ती नुसार योग्य ते रूंदीकरण करून करण्यात यावा व राज्य मार्ग ते वळसे वस्ती रस्ता करण्याऐवजी पिसेगाव गांजपूर मार्ग ते कोलदरा वस्ती असा रस्ता करण्यात यावा,कोलदरा या वस्तीवरील लोकांना रस्ता हा खूप आवश्यक आहे,

  • पिसेगाव बोगस रस्ता कामांची तक्रार
    जिल्हा परिषद कडून गटविकास अधिकारी यांना चौकशीचे आदेश

पिसेगाव तालुका केज या गावी मातोश्री ग्रामसडक पानंद रस्ते योजना अंतर्गत मंजूर असलेल्या पिसेगाव ते कोंडूळवस्ती रस्ता व राज्य मार्ग ते वळसे वस्ती रस्ता हे काम या पुर्वीच विविध योजना व लोकसहभागातून शेतकरी सहकार्य करतील अशी कामे करण्यात आलेली आहे,पिसेगाव ते कोंडूळवस्ती रस्ता हे काम गेल्या उन्हाळ्यातच काही सामाजिक कार्यकर्ते यांच्या अर्थसहाय्यने जेसीबी मशीन यंत्रणे द्वारे कुठे 10फुट तर कुठे 15 रूंदीकरण करून खोदकाम करण्यात आलेले आहे,तर राज्य मार्ग ते वळसे वस्ती रस्ता या रस्त्याच्या काही काम खडीकरण तर काही सिमेंट ने करण्यात आलेले आहेत, गावातील सत्ताधारी नेते व अधिकारी यांनी संगनमत करीत याच झालेल्या खोदकामावर रोहयो मस्टर ला संबंधित लोकांच्या नावे बोगस लावून रोजगार मागणी केली आहे या कामांची बोगस बिले उचलून गावकऱ्यांची व शासनाची फसवणूक होऊ शकते ,तरी गटविकास अधिकारी यांनी या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून पुढील योग्य कारवाई करावी अशी तक्रार गावातील सामाजिक कार्यकर्ते सुशील नेहरकर यांनी गटविकास अधिकारी यांना दिनांक 25/7/2022 या दिवशी लिखीत स्वरुपात दिली होती,यावर गटविकास अधिकारी यांच्याकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नव्हती, म्हणून दिनांक 7/8/2022 रोजी सामाजिक कार्यकर्ते सुशील नेहरकर यांनी आपले सरकार या पोर्टल वर जिल्हा परिषद बीड, जिल्हाधिकारी बीड,व रोहयो मंत्रालय महाराष्ट्र राज्य यांना ऑनलाईन तक्रारी अर्ज दाखल केला,याची तात्काळ दखल घेत जिल्हा परिषद CEO बीड यांच्याकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती केज यांना चौकशी चे आदेश देण्यात आले आहेत,

चौकट
पिसेगाव ते कोंडूळवस्ती रस्ता हा मंजूर असल्याने पुन्हा शासनाने दिलेल्या अटी शर्ती नुसार योग्य ते रूंदीकरण करून करण्यात यावा व राज्य मार्ग ते वळसे वस्ती रस्ता करण्याऐवजी पिसेगाव गांजपूर मार्ग ते कोलदरा वस्ती असा रस्ता करण्यात यावा,कोलदरा या वस्तीवरील लोकांना रस्ता हा खूप आवश्यक आहे,
सुशील नेहरकर


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button