पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या गणपतीचे दर्शन घेतले
बीड : मागच्या अडीच वर्षांत राज्यसभा, विधान परिषद आणि परवाच्या मंत्रिमंडळ विस्तारात नावाची चर्चा असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना संधी मिळाली नाही.
आता चर्चा असलेल्या विस्तारात पंकजा मुंडे यांना संधी मिळेल का? असा प्रश्न आणि संधी मिळेलच असा त्यांच्या समर्थकांना विश्वास आहे. दरम्यान, त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गणपतीचे दर्शन घेतले. सत्तेचा प्रसाद त्यांना मिळेल का? हे पाहावे लागेल.
विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर पंकजा मुंडे यांचा त्यांच्या जिल्ह्याचे होमपिच असलेल्या बीड जिल्ह्यातील वावर मर्यादितच आहे. सुरुवातीच्या काळातच कोरोना विषाणू संसर्गामुळे मर्यादा होत्या. नंतर अनेक नैसर्गिक आपत्तींसह इतर कोणत्याही संकटात त्या धडाडीने धावून आल्याचे, तत्कालीन आघाडी सरकारच्या विरोधात जिल्ह्यात मोठे आंदोलन केल्याचे उदाहरण नाही. त्यांच्याकडे मध्यप्रदेश सहप्रभारी पदाची जबाबदारी आहे.
दरम्यान, या कालावधीत विधान परिषद, राज्यसभांच्यावेळी पंकजा मुंडे यांचे नाव चर्चेत आले असले तरी त्यांच्यापेक्षा अनेक दुय्यम लोकांना संधी मिळाली. त्यामुळे मुंडे समर्थकांनी थेट नाराजीही व्यक्त केली. मागच्या महायुती सरकारच्या काळापासून देवेंद्र फडणवीस व त्यांचे संबंध तेवढे चांगले नसल्याचे उघड असल्यानेच त्यांची संधी वारंवार टळली हे वास्तव आहे. मात्र, आमच्यात काहीही दुरावा – अंतर नाही असे दोघांकडून सांगितले जाणे हे तेवढेच वरकरणी आहे.
अलीकडची शिंदे – फडणवीस सरकारची स्थापना व मंत्रिमंडळ विस्तारानंतरच्या पंकजा मुंडे यांच्या प्रतिक्रिया बरेच काही सांगून जातात. मात्र, सरकार स्थापनेच्या काळात व तत्पूर्वी व नंतर त्यांचा भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकांतील वावर आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी वाढलेला संवाद भविष्यासाठी काहीसा सुखद वाटत आहे.
त्यातच गुरुवारी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी खुद्द फडणवीस नसले तरी पंकजा मुंडे व अमृता फडणवीस यांच्यात संवाद झाला. आता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे हे निश्चित आहे. आताच्या मंत्रिमंडळात एकही महिला नाही. भविष्यातील विस्तारात महिलेचा सहभाग होईल हे निश्चित