मरणाने जरी सुटका केली तरी ही सुटका आत्ता गावच्या गावकऱ्यांना अभिशाप
- माणूस मरतो-सरणावर जातो मात्र अंत्यसंस्कार करतांना योग्य व्यवस्थापन नसेल तर मरणातही त्याचा छळ होतो कारण मृत्यु हा अंतिम सत्य आहे. असेच मनले जाते त्यामुळे ‘मरणाने सुटका जगण्याने मजला छळले होते’ असे सुप्रसिद्ध कलाकार सुरेश भट्ट यांनी लिहून ठेवले आहे. मरणाने जरी सुटका केली तरी ही सुटका आत्ता गावच्या गावकऱ्यांना अभिशाप ठरताना दिसत आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा या सह अनेक गावत अद्यापही स्मशानभूमी नाहीत. याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासन दुर्लक्ष आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा व बहुतांश गावांमध्ये स्मशानभूमीची आवस्था भकास झाली आहे.
अनेक गावांमध्ये शेडच नसल्याने रस्त्याच्या कडेला किंवा उघड्यावरच आंत्यासंस्कार करावे लागत आहेत. त्यामुळे सबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे तालुक्यात स्मशानभूमीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सेनगाव तालुक्यात गावे, वाड्या, तांडे वस्त्या अशी अनेक गावात स्मशनभूमीचा अपवाद सोडला तर ग्रामीण भागामधील अनेक गावामध्ये आज स्मशनभूमीचा प्रश्न गंभीर बनला आहे. अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा मिळावी, यासाठी संघर्ष करावा लागत आहे. दरम्यान प्रत्येक गावात सुविधा असलेली स्मशनभूमी आसावी अशी संकल्पनाच राहिली आहे. तालुक्यातील लोक प्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे अद्यापही ग्रामीण भागातील स्मशानभूमि नाहीत.
हिवरखेडा येथील शेतकरी खंडू खुडे यांनी (दि. 26 आॅगस्ट रोजी) विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तब्बल एक किलोमीटर चिखल तुडवत त्यांच्या शेतात त्यांना न्यावे लागले होते आणि आज अश्रुबा घाटे यांच्या मृत्यू झाला आहे. पावसामुळे त्यांच्यावर शेतात पत्रे टाकून अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यामुळे आत्ता तरी प्रशासनाच्या वतीने हिवरखेडा येथे तात्काळ स्मशान भूमी बांधण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थाकडून केली जात आहे.
आज सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा या गावची लोकसंख्या 1500 आहे, मात्र अद्यापही या गावात स्मशानभूमी नसल्याने पावसाळ्यात गावातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाले तर त्यांच्या अंत्यसंस्कार करण्यासाठी अनेक अडचणीला समोरा जावे लागते. या प्रसंगी टिनपत्रे लाऊन अंत्यसंस्कार करावे लावतात. काही वेळा तर पावसमुळे सरणं जळतच नाही. त्यामुळे शेवटच्या क्षणी मृतदेहाची हेळसांड होते. त्यामुळे गाव तिथे स्मशानभूमी शेड होणे गरजेचे आहे. असे वास्तव असले तरी सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथे अद्यापही स्मशानभूमी नाही. या गावातील ग्रामस्थ ज्यांच्या त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करतात मात्र जे ग्रामस्थ भूमिहीन आहेत. त्यांना रोडच्या काठाला अंत्यसंस्कार करावे लागतात. हिवरखेडा येथील गावातील गावठाणाच्या जागेवर जे अतिक्रमण झाले आहे ते अतिक्रमण तात्काळ काढून तेथें स्मशानभूमी करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे.