पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटक आणि केरळच्या दौऱ्यावर 3800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 आणि2 सप्टेंबर रोजी कर्नाटक आणि केरळच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 1 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता पंतप्रधान मोदी कोचीन विमानतळाजवळील कलाडी गावातील आदि शंकराचार्यांचे पवित्र जन्मस्थान श्री आदिशंकर जन्मभूमी क्षेत्रमला भेट देतील.
2 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता, पंतप्रधान कोची येथील कोचीन शिपयार्ड लिमिटेड येथेआय एन एस विक्रांत या पहिल्या स्वदेशी विमानवाहू नौकेचे लोकार्पण करणार आहेत. त्यानंतर दुपारी 1:30 वाजता, पंतप्रधान मंगळुरूमध्ये सुमारे 3800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.
कोची येथील पंतप्रधानांचा कार्यक्रम
पंतप्रधान आत्मनिर्भतेचे, विशेषत: धोरणात्मक क्षेत्रातील खंदे समर्थक आहेत. संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पंतप्रधान आयएनएस विक्रांत या स्वदेशी बनावटीच्या आणि बांधणीच्या विमानवाहू नौकेचे लोकार्पण करतील. भारतीय नौदलाच्या इन-हाऊस वॉरशिप डिझाईन ब्युरो (WDB) द्वारे डिझाइन केलेले आणि बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील शिपयार्ड, कोचीन शिपयार्ड लिमिटेडने बांधलेले, विक्रांत हे अत्याधुनिक ऑटोमेशन (स्वयंचलित) वैशिष्ट्यांसह निर्माण गेले आहे आणि ते भारताच्या सागरी इतिहासात आतापर्यंत कधीही बांधली न गेलेली सर्वात मोठी नौका आहे. 1971 च्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारी भारताची पहिली विमानवाहू नौका आणि तिच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर विक्रांत हे नाव या स्वदेशी विमानवाहू नौकेला देण्यात आले आहे. यात देशातील प्रमुख औद्योगिक , कंपन्या तसेच 100 हून अधिक सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांचा (एमएसएमई) यांनी तयार केलेली स्वदेशी उपकरणे आणि यंत्रसामग्री आहे. विक्रांतच्या नौदलात सामील होण्यामुळे, भारताकडे आता दोन कार्यरत विमानवाहू नौका असतील, ज्यामुळे देशाची सागरी सुरक्षा बळकट होईल.
सुमारे 3,800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन
पंतप्रधान मंगळुरूमध्ये सुमारे 3,800 कोटी रुपयांच्या यांत्रिकीकरण आणि औद्योगिकीकरण प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. न्यू मंगळूर बंदर प्राधिकरणाने हाती घेतलेल्या कंटेनर आणि इतर माल हाताळण्यासाठी धक्का क्रमांक 14 च्या यांत्रिकीकरणासाठी 280 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या प्रकल्पाचे पंतप्रधान उद्घाटन करतील. या यांत्रिकी टर्मिनलमुळे कार्यक्षमता वाढेल विविध टप्प्यांमधील माल हाताळणी चा वेळ सुमारे 35% कमी होईल, त्यामुळे व्यवसायाच्या वातावरणाला चालना मिळेल. या प्रकल्पाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे, ज्यामुळे हाताळणी क्षमतेत 4.2 MTPA पेक्षा जास्त वाढ झाली आहे, जी 2025 पर्यंत 6 MTPA पेक्षा जास्त होईल.
बंदराद्वारे हाती घेतलेल्या सुमारे 1,000 कोटी रुपये खर्चाच्या पाच प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधान करणार आहेत. अत्याधुनिक क्रायोजेनिक एलपीजी स्टोरेज टँक टर्मिनलसह सुसज्ज एकात्मिक एलपीजी आणि बल्क लिक्विड पीओएल सुविधा, ज्या 45,000 टन पूर्ण लोड VLGC (खूप मोठे गॅस वाहक) अत्यंत कार्यक्षमतेने उतरवण्यास सक्षम असेल. देशातील सर्वोच्च एलपीजी आयात करणार्या बंदरांपैकी एक म्हणून या बंदराचा दर्जा अधिक मजबूत केल्यानंतर ही सुविधा, या भागात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेला चालना देईल. साठवण टाक्या आणि खाद्य तेल शुद्धीकरण, बिटुमन स्टोरेज आणि संबंधित सुविधांचे बांधकाम आणि बिटुमन आणि खाद्यतेल साठवण आणि संबंधित सुविधांचे बांधकाम या प्रकल्पांची पायाभरणी देखील पंतप्रधान करणार आहेत. या प्रकल्पांमुळे बिटुमन आणि खाद्यतेल वाहक जहाजांच्या येण्याजाण्याच्या वेळेत सुधारणा होईल आणि व्यापारासाठी एकूण मालवाहतुकीचा खर्च कमी होईल. कुलाई येथे फिशिंग हार्बरच्या विकास कामांची पंतप्रधान पायाभरणी करतील, ज्यामुळे मासे पकडण्याची सुरक्षित हाताळणी सुलभ होईल आणि जागतिक बाजारपेठेत चांगली किंमत मिळेल.