भारतावर मोठं संकट
बल्गेरियात राहणारे अंध वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा उर्फ बाबा वेंगा (Baba Vanga) हे एक प्रसिद्ध भविष्यवक्ते आहेत. असे म्हणतात की दृष्टी नसतानाही त्यांना भविष्य स्पष्टपणे सांगता येतं, ही त्यांना देवाने दिलेली एक मोठी देणगी आहे.
बाबा वेंगा (Baba Vanga Prediction) यांनी केलेल्या आतापर्यंत 2 भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत, तर इतर 4 अजून खऱ्या ठरायच्या बाकी आहेत. या भविष्यवाणीत त्यांनी भारतासाठीही भाकित केलं होतं.हे भाकित काय आहे? तसेच याचा भारताला किती धोका असणार आहे,ते जाणून घेऊय़ात.
भारतावर यावर्षांत टोळधाडीचं संकट ओढवणार आहे. यावर्षी जगात तापमानात घट होणार असून, त्यामुळे टोळांचा प्रादुर्भाव वाढणार आहे. हिरवळ आणि अन्नामुळे, टोळांचे थवे भारतावर हल्ला करतील, ज्यामुळे पिकांचे गंभीर नुकसान होईल आणि देशात दुष्काळ पडणार आहे.
दरम्यान बाबा वेंगा (Baba Vanga) यांनी केलेल्या अनेक भविष्यवाण्या आतापर्यंत खऱ्या ठरल्या आहेत. त्यामुळे आता भारताबाबत केलेल हे भाकित आता कितपत खरे ठरतं हे भविष्यात कळणार आहे. पण त्यांचे अनेक अंदाज खरे ठरताना पाहून अनेकांना भीती वाटतं आहे.