‘तुम्ही खुप शिकून मोठ्या पदावर विराजमान व्हा’ – पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर
राखी पौर्णिमा म्हटल की भावाकडून बहिणीला काहीतरी अविस्मरणीय भेट ही निश्चित असतेच मात्र कोण कोणत्या स्वरूपाची भेट देणार हे मात्र निश्चित नसते. बहिण भावाचे नाते घट्ट करणारे असे पवित्र बंधन म्हणजे रक्षाबंधन अतिशय पवित्र समजलं जाणारे हे बंधन लक्षात घेवून दरवर्षी अनेक मुली आणि महिला आपल्या भावांसह हितचिंतकांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा करतात.
याच रक्षाबंधनाचे औचित्य साधून गुरूवारी बीड येथील स्काऊट गाईडच्या विद्यार्थीनींनी पोलिस अधीक्षक कार्यालयात येवून अधीक्षकांना राख्या बांधल्या, ‘तुम्ही खुप शिकून मोठ्या पदावर विराजमान व्हा’ अशा शुभेच्छा यावेळी राखी बांधण्यासाठी आलेल्या विद्यार्थीनींना स्वत:च्या खुर्चीवर बसवून पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिल्या आहेत.
रक्षाबंधनाचे औचित्य साधून एसपींनी विद्यार्थीनींना दिलेल्या या मान सन्मानाचे संपूर्ण जिल्हाभरातून आता कौतूक केले जात आहे.
गुरूवारी राखी पौर्णिमेचे औचित्य साधून बीडमधील स्काऊट गाईडच्या विद्यार्थीनी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना राखी बांधण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात आल्या, या विद्यार्थीनींचे पोलीस अधीक्षकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले, त्यानंतर त्यांना सर्व विद्यार्थीनींनी राखी बांधल्या. विशेष म्हणजे ‘तुम्ही खुप शिकून मोठ्या पदावर विराजमान व्हा’ अशा शुभेच्छा एसपींनी विद्यार्थीनींना स्वत:च्या खुर्चीवर बसवून दिल्या आहेत. आलेल्या मुलींना अशी ही अनोखी भेट भावाकडून मिळाल्याने मुलींना नक्कीच आयुष्यात अविस्मरणीय ठरली आहे.