नवरी मेहंदी लावून नवरदेवाची वाट बघत होती नवरदेव वरात घेऊन आलाच नाही
उत्तर प्रदेशमधून (Uttar Pradesh) प्रेम प्रकरणात दगा मिळाल्याची एक हैराण करणारी घटना समोर आली आहे.
इथे एका तरूणीच्या घरी लग्नाची सगळी तयारी झाली होती आणि नवरदेवासोबत पाहुण्यांची वाट पाहिली जात होती. पण नवरदेव वरात घेऊन आलाच नाही. नवरदेव तिचा प्रियकर होता. झालं असं की, अमरोहामधील एका तरूणाने लग्नाचं आमिष दाखवत तरूणीसोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर हुंड्यावरून लग्न करण्यास नकार दिला. याबाबत नंतर पंचायतमध्ये करार झाला होता, आणि ठरलं होतं की, नवरदेव तरूणीच्या घरी वरात घेऊन जाईल. पण असं झालं नाही.
जेव्हा प्रेयसीच्या घरी आरोपी प्रियकर 7 ऑगस्टला वरात घेऊन आला नाही तेव्हा 8 ऑगस्ट रोजी तिने एसपी ऑफिसला जाऊन न्यायाची मागणी केली. गावात राहणारी दिव्यांग तरूणी तिच्या भाओजी आणि बहिणीसोबत एसपीच्या ऑफिसमध्ये पोहोचली होती. तिथे तिने सांगितलं की, 3 महिन्याआधीपासून पीडित दिव्यांग तरूणीचं गावातीलच एका तरूणासोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. प्रियकराने लग्नाचं आमिष दाखवत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. पण लग्नासाठी त्याने नकार दिला.
सांगण्यात आलं की, गेल्या 6 ऑगस्ट रोजी झालेल्या पंचायतमध्ये तरूण लग्नासाठी तयार झाला होता. 7 ऑगस्टला वरात येणार होती, पण हुंडा कमी असल्याने नवरदेवाने वरात आणली नाही. ज्यामुळे मुलीकडील लोकांचं फार नुकसान झालं. कारण लग्नाची सगळी व्यवस्था करण्यात आली होती. जेवण तयार करण्यात आलं होतं आणि नवरी मेहंदी लावून नवरदेवाची वाट बघत होती.
याप्रकरणी सांगण्यात आलं की, पीडित तरूणीला आई-वडील नाहीयेत. तिचे भाओजी आणि तिची बहिणी दोघींचं लग्न लावून देत होते. त्यांनी आरोपी नवरदेव आणि तिच्या कुटुंबियांविरोधात एसपी ऑफिसमध्ये तक्रार दाखल केली. तसेच कारवाईची मागणी केली.
6 ऑगस्टच्या सायंकाळी पंचायतमध्ये नवरदेव वरात घेऊन जाणार असं ठरलं होतं. त्यामुळे मुलीकडील लोकांनी वरातीच्या स्वागतासाठी सगळी तयारी केली होती. 7 ऑगस्टला नवरीकडील लोक नवरदेवाची वाट बघत होते. आता पीडित तरूणीने कुटुंबियांसोबत जाऊन तरूणाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली