बीड14 कोटी खर्चाची योजना मात्र, भर पावसाळ्यात बीडकर तहानलेले
बीड : शहरात अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम कार्यारंभ आदेशानुसार तीन वर्षात पूर्ण करायचे होते. मात्र चार वर्षाचा कालावधी होऊनही काम अपूर्णच आहे. बीड शहराला नियमित पाणी पुरवठा करता यावा यासाठी बीड नगर परिषदेकडून अमृत अटल योजनेचे काम हाती घेतले.
14 कोटी खर्चाची ही योजना आहे. मात्र, अद्याप या योजनेचे पाणी नागरिकांना मिळालेले नाही. सध्या 10 ते 15 दिवसाला नागरिकांना पाणी मिळत आहे. कामाच्या दिरंगाईमुळे भर पावसाळ्यात बीडकर तहानलेले आहेत.
देशात 75 वा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. असे असताना बीडमध्ये मात्र पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावाच लागत आहे. बीड शहराकरिता 114 कोटी 63 लाख रुपयांची अमृत पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. 2017 रोजी या योजनेची सुरुवात झाली आहे.
२०२० पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु चार वर्ष होऊन देखील योजनेचे काम पूर्ण झालेले नाही, नगरपालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ढिसाळ कारभारामुळे ही योजना अद्यापही पूर्ण झाली नसल्याचे नागरिकात चर्चा आहे. परिणामी भर पावसाळ्यात शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे
बीड शहराला माजलगाव आणि बिंदुसरा धरणातून पाणीपुरवठा केला जातो.
सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी अमृत पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. या योजनेची मुदत संपली असली तरी अद्याप काम पूर्ण झालेलं नाही. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी 15 ते 20 दिवसांची वाट पहावी लागत आहे. शहरातील काही भागात तर 15 ते 20 दिवस पाणी येत नाही.