सोशल मीडियामुळे स्त्रियांचे जननेंद्रिय कसे आले धोक्यात, ‘आमच्या योनीमार्गाचा रंग खूपच गडद झाला आहे का?’
काही पोस्ट आणि व्हीडिओज मध्ये स्त्रियांच्या जननेंद्रियाचा गंध कसा असावा किंवा ते कसे दिसावे याबद्दल काही उत्पादनं सुचवण्यात येतात. या पोस्ट आणि व्हीडिओ लाखो लोकांनी बघितल्या आहेत.
स्त्रीरोगतज्ज्ञ मात्र अशा उत्पादनांच्या वापराबद्दल धोक्याचा इशारा देतात. या उत्पादनांमुळे योनीमार्गाचा पीएच कमी जास्त होतो आणि त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका होतो असं त्या सांगतात.
योनीमार्गाचं आणि योनीचं एक विशिष्ट वातावरण असतं. एखाद्या रसायनामुळे त्यांची रचना बदलते असं स्त्रीरोग तज्ज्ञ मुजदेगुल झाईफोगलू कारसा सांगतात.
“जेव्हा मी पहिल्यांदा व्हजायना परफ्युमबद्दल ऐकलं तेव्हा मला धक्काच बसला. योनीमार्गासाठी परफ्युम आहे तर मग लिंगासाठी का नाही?” त्या विचारतात.
स्त्रियांच्या बाह्य गुप्तांगांसाठी योनी असा शब्द वापरला जातो. योनीमार्ग हा स्नायूंचा एक पॅसेज आहे जो शरीराच्या बाहेर ग्रीव्हेला जोडतो.
ऐयलुल गुल्स कारा इस्तंबूलमध्ये विद्यार्थिनी आहेत. सोशल मीडियावर स्त्रियांवर दबाव टाकला जातो त्यामुळे त्या वैतागल्या आहेत.
BBCBBC
“समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्हाला सतत काहीतरी करावं लागतं असं वाटतं,” त्या म्हणतात.
“आता काय आमच्या योनीमार्गाचा रंग फारच गडद झाला आहे?” असा प्रश्न त्या विचारतात.
‘परिपूर्ण योनी असं काही नसतं’
‘परिपूर्ण योनी’ असं काही नसतं असं वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.
“प्रत्येक स्त्रीची योनी वेगळी असते,” असं बेरिंग टेक्झान सांगतात. त्या लंडनच्या रॉयल कॉलेजमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत.
“एखाद्या स्त्रीच्या योनीचा रंग आकार, दुसऱ्या स्त्री सारखा नसतो.” त्या सांगतात.
“जेव्हा माझे पेशंट्स माझ्याकडे येतात आणि सांगतात की त्यांच्या योनीत काहीतरी गडबड आहे आणि मी जेव्हा त्यांना सांगते की सगळं व्यवस्थित आहे आणि तुमच्या शरीरात काहीही बिघाड नाही तेव्हा 90% लोक सुटकेचा नि:श्वास टाकतात. मात्र काही देशात स्त्रियांना योग्य सल्ला देणाऱ्या स्त्रीरोग तज्ज्ञ नाही. इराण मध्ये उदाहरणार्थ बायकांचे लैंगिक आरोग्य हा एक टॅबू समजला जातो. त्यांच्या गुप्तांगांबद्दल चर्चा केली तर महिलांना लाज वाटते.
काही सोशल मीडिया युजर तक्रार करतात की डॉक्टरच बॉडी शेमिंग करून त्यांना अस्वस्थ करतात.
BBC
“माझ्या एका मैत्रिणीने लॅबिओप्लास्टी ही सर्जरी केली. आम्ही तिला विचारलं की तिने इतकी गैरसोयीची ही सर्जरी का केली,” अशी एक पोस्ट एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिली होती.
तिने आम्हाला सांगितलं “कारण माझा डॉक्टरसारखा मला विचारायचा की तुझ्या योनीच्या लेबिया इतक्या वाईट का दिसतात? त्या इतक्या मोठ्या आणि कुरूप का आहेत? तुझ्या योनीमार्गाचं ओपनिंग इतका मोठा का आहे? तुझी नैसर्गिक प्रसूती झाली होती का? या प्रश्नांना वैतागून म्हणून मी सर्जरी केली.”
Getty Imagesकाही देशांमध्ये, अजूनही त्यांच्या आरोग्याबाबत सल्ला मिळवण्यासाठी विश्वासार्ह स्त्रीरोगतज्ज्ञांना भेटता येत नाही (प्रातिनिधिक फोटो)
लॅबिओप्लास्टी ही स्त्रियांच्या गुप्तांगाबद्दलची सगळ्यात सामान्यपणे आढळणे सर्जरी आहे. जगभरातील तरुणींमध्ये ही सर्जरी करण्याचे प्रमाण वेगाने वाढते आहे.
या सर्जरीमध्ये योनीच्या लेबियाचा आकार नीट केला जातो.
अठरा वर्षाखालील मुलींमध्ये ही सर्जरी करू नये कारण पौगंडावस्थेनंतर सुद्धा लेबिया विकसित होत राहतो.
स्त्रियांसाठी आणि पारलिंगी लोकांसाठी ही उपचारपद्धती असू शकते. स्वच्छता, सेक्स करताना होणारा त्रास किंवा व्यायाम करताना अस्वस्थ वाटणं या कारणामुळे स्त्रिया ही सर्जरी करू शकतात.
मात्र गुप्तांग कसे दिसतात या काळजीपायी अनेक लोकांना ही सर्जरी करायची असते.
BBC
महिलांच्या आरोग्यासंदर्भातील इतर काही महत्त्वाच्या बातम्या :
BBC
लेबिओप्लास्टीचं वाढतं प्रमाण
ऑस्ट्रेलियामध्ये पाच लाखापेक्षा अधिक लोकांनी ही सर्जरी केली आहे किंवा त्यांना करण्याची इच्छा आहे असं एका अहवालात आढळून आलं आहे.
वुमन्स हेल्थ व्हिक्टोरिया या मासिकात मध्ये लेबिया डायव्हर्सिटी रिपोर्ट प्रकाशित झाला आहे 18 ते 50 वयोगटातील महिलांना घेऊन एक सर्वेक्षण करण्यात आलं. त्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला.
पॉर्नोग्राफी आणि सोशल मीडियामुळे लोकांना ही सर्जरी करायची आहे. महिलांचे गुप्तांग कसे दिसावे याबद्दलचे व्हीडिओ आणि फोटो यामुळे गैरसमज वाढत आहेत असं या अहवालात नमूद केलं आहे.
इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ॲस्थेटिक प्लास्टिक सर्जरी या संस्थेच्या अहवालानुसार 2019 च्या तुलनेत 2023 मध्ये हे प्रमाण 14.8% ने वाढलं आहे.
Getty Imagesप्रातिनिधिक फोटो
जागतिक पातळीवर केलेल्या अहवालानुसार ही सर्जरी करण्यात ब्राझील सर्वात आघाडीवर आहे. 28 हजार लोकांनी आतापर्यंत ही सर्जरी केली आहे.
रेनाटा मेघॅलिस या ब्राझिलियन सोसायटी ऑफ प्लास्टिक सर्जरीच्या सदस्या आहे. त्या म्हणतात, ” ब्राझीलमधील महिला त्यांच्या दिसण्याबद्दल अतिशय सजग असतात आणि प्लॅस्टिक सर्जरीकडे त्यांचा ओढा असतो.”
Instagram.com/valsantanafittब्राझीलच्या बॉडीबिल्डिंग अॅथलीट वॅल सँटाना म्हणाल्या की लॅबियाप्लास्टी केल्याने त्यांचा आत्मविश्वास आणि जीवनाची गुणवत्ता सुधारली
वॉल संताना या 27 वर्षीय बॉडी बिल्डिंग अॅथलिट असून त्यांनी ही शस्त्रक्रिया करायचं ठरवलं. त्या म्हणतात, “मी गेल्या सहा वर्षापासून बॉडी बिल्डिंग करते आणि स्टिरॉइड्स घेते या अनुभवावरून मी ही सर्जरी करायचं ठरवलं,” बीबीसी न्यूज ब्राझीलशी त्या बोलत होत्या.
बोल्डेनोन आणि ऑक्सॅनड्रोलोन या औषधांमुळे शिश्निकेचा आकार वाढतो. सेक्स करताना त्या स्वत:बद्दल अतिसजग होत्या. हा त्यांच्यासाठी अडचणीचा मुद्दा होता.
त्यांनी इन्स्टाग्रामवर या सर्जरीचा अनुभव सांगितला. त्यांच्या मते या सर्जरीमुळे त्यांचा आत्मविश्वास आणि आयुष्याचा दर्जा वाढला.
काही धोके
युके मधील नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या (NHS) मते लॅबिओप्लास्टी हा खूप मोठा निर्णय आहे आणि हा निर्णय काळजीपूर्वक घ्यायला हवा.
“ही अतिशय महागडी शस्त्रक्रिया आहे आणि त्यात अनेक धोके आहेत. तुम्हाला अपेक्षित निकाल मिळेलच याची काही शाश्वती नाही. तसंच तुमच्या शरीराबद्दल चांगलं वाटेलच असं नाही.” असं NHS चं म्हणणं आहे.
लेबिओप्लास्टीमुळे अनेकदा रक्तस्राव होतो., संसर्ग, एखादा टिश्यू फाटणं, गुप्तांगामधली संवेदना कमी होते. तसंच या सर्जरीमुळे शिरांमध्ये गुठळ्या निर्माण होतात किंवा भूल देण्याच्या औषधाची ॲलर्जी होऊ शकते.
Getty Imagesस्त्रीरोग तज्ञ म्हणतात की स्त्रियांनी स्त्री जननेंद्रियाबद्दल अधिक जाणून घेतले पाहिजे आणि स्वतःच्या शरीराबाबत स्वतःच ज्ञान वाढवलं पाहिजे.
“काही महिलांना त्यांच्या योनीच्या लेबिया आवडत नाही म्हणून त्या ही सर्जरी करतात. मात्र योनीमार्ग जिथे उघडतो तिथे त्वचेच्या घड्या पडणं अगदीच सामान्य आहे.” असं NHS चं म्हणणं आहे.
स्त्रीरोगतज्ज्ञ मुजदेगुल झाईफोगलू कारसा सांगतात की महिलांना त्यांच्या गुप्तांगाबद्दल अधिक माहिती घेणं आवश्यक आहे आणि कोणतीही सर्जरी करण्याच्या आधी शरीराचा स्वीकार करायला हवा.
ऐयलुल गुल्स सुद्धा याच्याशी सहमत आहेत. “स्त्रियांच्या लैंगिक आरोग्याबद्दल माहिती मिळावी म्हणून आम्ही सोशल मीडिया वापरतो क्रीम वापरा किंवा सर्जरी करा या कंटेटपेक्षा स्त्रियांवर जो दबाव असतो. त्यातून सुटका करणारं कंटेट जास्त तयार करायला हवं.”
(बीबीसी न्यूज ब्राझीलच्या रिपोर्टर गुलिया ग्रांची यांच्या अतिरिक्त वार्तांकनासह)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
source: bbc.com/marathi