कधी भूकंप, कधी त्सुनामी, कधी पूर, कधी भूस्खलन पृथ्वीवर येणारी संकटं काही कमी नाहीत. आता एक-दोन नाही तर तब्बल 5 संकटं पृथ्वीच्या दिशेनं येत आहेत. नासाने याबाबत अलर्ट जारी केला आहे.
या आठवड्यातच ही घटना घडणार आहे. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नासाकडे एक यंत्रणा आहे, जी पृथ्वीपासून 7.5 दशलक्ष किलोमीटरच्या आत असलेल्या लघुग्रहांचा मागोवा घेते. नासाने सांगितल्यानुसार एक-दोन नाही तर पाच महाकाय लघुग्रह पृथ्वीच्या दिशेनं येत आहेत. यातील एक फुटबॉल स्टेडियमच्या आकाराइतका आहे. जो पृथ्वीच्या अगदी जवळून जाईल.
नासाच्या लघुग्रह वॉच डॅशबोर्डनुसार, या आकाशीय ‘दैत्यां’चं नेतृत्व 2008 OS7 नावाच्या लघुग्रहाने केलं आहे, ज्याचा शोध नासाने 2008 मध्ये लावला होता. त्याची रुंदी 890 फुटांपेक्षा जास्त आहे. नासाच्या म्हणण्यानुसार, ही महाकाय उल्का 2 फेब्रुवारीला पृथ्वीच्या दिशेने येण्यास तयार आहे. नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी (जेपीएल) नुसार, त्यावेळी ते पृथ्वीपासून 2,850,000 किलोमीटर अंतरावर असेल. जे तुलनेने सर्वात कमी अंतर असेल. म्हणजे आतापर्यंत इतका मोठा लघुग्रह इतका जवळून गेला नव्हता. जरी, त्याचा कोणताही परिणाम होणार नाही, परंतु हा एक अतिशय रोमांचक क्षण असेल.
चंद्र, सूर्याप्रमाणे पृथ्वीही मावळते; असा तुम्ही कधीच पाहिला नसेल
नासाच्या मते, पृथ्वीजवळील बहुतेक वस्तू अशा आहेत की त्यांच्या कक्षा भिन्न असल्यामुळे ते पृथ्वीवर आदळत नाहीत. त्यामुळे त्यांच्यापासून कोणताही धोका नाही. पण जेव्हा यातील एक छोटासा भाग बाहेर येतो, ज्यांना धोकादायक लघुग्रह म्हणतात, तेव्हा त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 2008 OS7 व्यतिरिक्त, नासाने इतर चार लघुग्रहांबद्दल देखील इशारा दिला आहे. ज्यांचा आकार घरापासून ते इमारतीइतका आहे.
1 फेब्रुवारी रोजी 62 फूट लांबीचा 2024 BY लघुग्रह पृथ्वीजवळून जाईल. तेव्हा त्याचं पृथ्वीपासूनचं अंतर 2,530,000 किमी असेल. काही काळानंतर, 2003 BM4 पृथ्वीच्या जवळून जाईल. त्याचा व्यास 120 फूट आहे. त्याचं पृथ्वीपासूनचं अंतर 3,320,000 किलोमीटर असेल. यानंतर 2 फेब्रुवारी 2024 रोजी BP1 पृथ्वीपासून 3,420,000 किमी अंतरावरून जाईल. तो 130 फूट आहे.
तुम्हाला माहिती आहे का कशावर असते पृथ्वी? ज्यामुळे ती कधीच खाली पडत नाही
शास्त्रज्ञांच्या मते, त्यांची टक्कर झाल्यास भयंकर विध्वंस होऊ शकतो. त्यामुळे अमेरिकन स्पेस एजन्सी नासासह अनेक संस्थांनी यांचा मार्ग बदलण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.