बीड युट्युब व्हिडिओ पाहून चक्क दुष्काळी भागात सफरचंदाची बाग फुलली
सफरचंदा चे पीक (Apple Farming) हे केवळ थंड हवेच्या ठिकाणीच वाढू शकतं. मात्र एका शेतकऱ्याने दुष्काळी भागात याचे उत्तम प्रकारे पीक घेऊन उत्पादन मिळवले आहे.
तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकरी शेतीमध्ये पिकांची लागवड करताना दिसून येत आहे. थंड ठिकाणी येणाऱ्या सफरचंदाच्या (Apple Farming in Maharashtra) बागा देखील आता महाराष्ट्रात चांगल्याच खुलू लागल्या आहेत. आता याबाबत दुष्काळी भाग असणारा बीड जिल्हा देखील मागे राहिला नाही. तर बीड जिल्ह्यामधील माजलगाव तालुक्यातील तेलगाव खुर्द येथील शेतकरी सुरेश सीताराम सजगणे व बाळासाहेब सीताराम सजगणे दोन भावांनी दुष्काळी भागात सफरचंदाची लागवड केली आहे.
आज मोबाईल काळाची गरज बनला आहे. छोट्या छोटी आणि मोठ्यात मोठी गोष्ट मोबाईलद्वारे लोकांना माहीत होत आहे. या दोन भावांमध्ये 40 एकर जमीन आहे. ते शेतीत (agriculture) केवळ पारंपारिक पिके घ्यायचे. मात्र त्यांनी मोबाईलद्वारे युट्युब व्हिडिओ पाहून चक्क दुष्काळी भागात सफरचंदाची बाग खुलवण्याचा अट्टाहास केला.
सुरेश सगणे यांनी सफरचंदाची लागवड करण्यापूर्वी विविध माध्यमातून तज्ञांचा सल्ला घेण्यासाठी संपर्क साधला. त्यांच्या शिक्षण केवळ चौथीपर्यंत झाले आहे. तरी देखील ते विविध व्हिडिओपाहून शेतीमध्ये प्रयोग करत असतात. सुरेश सहगणे यांनी मोठं धाडस दाखवत ऑनलाइन 600 सफरचंदाची रोपे मागवली. त्यांनी कोरोना काळात म्हणजेच डिसेंबर 2020 च्या दरम्यान आपल्या दीड एकर शेतीमध्ये यातील 400 रोपांची लागवड केली. त्यानंतर त्यांनी ड्रीप सिंचनाद्वारे या सफरचंदाच्या बागेला तीन ते चार दिवसांच्या अंतरावर पाणी दिले.
सफरचंदाचा एक हंगाम असतो. तर जानेवारी महिन्यामध्ये सफरचंदाच्या झाडाला फुले येतात. दीड महिन्यानंतर त्या फुलांचा रूपांतर फळांमध्ये व्हायला सुरुवात होते. तर जून जुलै दरम्यान फळ पूर्ण होऊन बाजारात विक्रीस तयार होत. अशी माहिती सुरेश सहगणे यांनी दिली आहे. दुष्काळी भागात शेती करणं किती अवघड आहे हे सर्वांनाच माहित आहे. परंतु दुष्काळी भागात थेट सफरचंदाची लागवड करून या शेतकऱ्याने इतर शेतकऱ्यांसमोर एक प्रेरणा ठेवली आहे.