धरतीखाली सापडलं दुसरं जग; तुम्हीसुद्धा तिथं जाऊ शकता
धर्मग्रंथ, पौराणिक कथांमध्ये आकाशापासून पाताळापर्यंतच्या सांगण्यात आलं आहे. त्यानुसार आकाशात देव वास करतात तर पाताळात दानवांचा वास असायचा. पण तुम्ही पाताळ लोक कधी पाहिलं आहे का?
पण पृथ्वीवर एक अशी जागा आहे जी पाताळलोकापेक्षा कमी नाही. पृथ्वीखाली आणखी एक दुसरं जग सापडलं आहे. या जगात असं काय काय आहे, हे सर्वजण थक्क झाले आहे.
1991 सालात हो खान नावाच्या मुलाने ही जागा शोधली, जो अनेक आठवडे अन्न आणि लाकडाच्या शोधात भटकत होता. अचानक त्याला एक गुहा दिसली आणि तो आत गेला. त्याला वाटलं की इथं काही खाद्यपदार्थ मिळतील. आत पोचताच त्याला आवाज ऐकू आला. नदी, वाऱ्याचा हा आवाज होता. जमिनीच्या खाली इतका आवाज ऐकून तो घाबरला आणि लगेच तिथून परतला. घरी परतल्यावर तो गुहा आणि ती जागाही विसरला.
खान या गुहेतून बाहेर पडल्यानंतर अनेक वर्षांनी गुहा संशोधनाशी संबंधित असलेल्या ब्रिटिश केव्ह रिसर्च असोसिएशनचं हॉवर्ड आणि डेब लिंबर्ट त्या ठिकाणी पोहोचले. यादरम्यान त्यांची हो खान यांच्याशी भेट झाली. बोलता बोलता खाननं दोघांना या गुहेबद्दल सांगितलं. खान म्हणाला की, जमिनीखाली फक्त गुहाच नाहीत तर नद्या, ढग आणि समुद्रकिनारेही आहेत. पण जशी वर्षे उलटून गेली, तसा तो तिथं जाण्याचा मार्ग विसरला. खान गुहेत जाण्याचा मार्ग शोधत राहिला. 2008 साली हो खाननं पुन्हा ही गुहा शोधून काढली आणि आत जाण्याचा मार्गही आठवला. यानंतर त्यानं हॉवर्ड आणि डेब लिम्बर्ट यांना याबाबत माहिती दिली.
ही गुहा 500 फूट रुंद, 660 फूट (सुमारे 200 मीटर) उंच आणि 9 किलोमीटर लांब आहे. आत गुहेची स्वतःची नदी, जंगल आणि अगदी स्वतःचं हवामान आहे. गुहेत वटवाघुळ, पक्षी, माकडे याशिवाय इतर अनेक प्राणी राहतात. ही गुहा कार्बोनिफेरस आणि पर्मियन चुनखडीपासून बनलेली आहे, ज्याचं वय अंदाजे 20 ते 50 लाख वर्षे आहे. या गुहेतील वारा आणि आवाज बाहेरच्या दरवाजापर्यंत ऐकू येतो.
2009 मध्ये एका ब्रिटिश संघटनेने या गुहेला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता दिली. सुरुवातीला सर्वांना या गुहेत जाण्याची परवानगी देण्यात आली नव्हती, परंतु नंतर 2013 मध्ये ती प्रथमच पर्यटकांसाठी खुली करण्यात आली. युनेस्कोच्या जागतिक वारसामध्ये समाविष्ट असलेल्या या गुहेत दरवर्षी मर्यादित संख्येने पर्यटक पाठवले जातात. सुरुवातीला दरवर्षी काही निवडक 250-300 लोकांनाच इथं जाण्याची परवानगी होती. 2016 पासून, 900 लोकांना परवानगी देण्यात आली आहे. जे तिथं 4 दिवस आणि 3 रात्री घालवतात.
त्यांना गुहेत जाण्यासाठी 6 महिन्यांचं प्रशिक्षण दिलं जातं. प्रशिक्षण घेत असलेल्या पर्यटकांना 10 किमी चालणं आणि 6 वेळा रॉक क्लाइंब केलं जातं. एवढंच नाही तर पर्यटकांना योगा करून त्यांची फिटनेस टेस्टही केली जाते. मात्र इथं जाण्यासाठी तिकीट आहे, त्यासाठी सुमारे दोन लाख रुपये आकारले जातात.
आता हे दुसरं जग आहेत तरी कुठे हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. व्हिएतनाममधील ही हंग सोन डुंग गुहा. जी जगातील सर्वात मोठी गुहा आहे. फोंग न्हा के-बँग राष्ट्रीय उद्यानात ही गुहा आहे. जी जमिनीपासून 262 मीटर खाली आहे.