भारतीय धम्म महासंघ बीड द्वारा भारतीय संविधान दिनानिमित्त परिसंवाद
बीड : सांस्कृतीक परिवर्तन घडवून आणण्यासाठी भारतीय धम्म महासंघ स्थापन करण्यात आला आहे. ह्या परिवर्तन प्रक्रियेत त्याचाच एक भाग म्हणून बुद्धाच्या सधम्माची ओळख व्हावी व पुढे चालुन तो अनुसरण करण्यासाठी बुद्ध वंदना आणि इतर उपक्रम चालू केले आहेत. बुद्ध वंदना कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद मिळत आहे. बुद्ध वंदना कार्यक्रमाबरोबरच महामानव यांचे जयंती उत्सव आणि अशोका विजयी दशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अभिवादन रॅली यशस्वीरीत्या साजरे करण्यात आले आहेत. याचे सर्व श्रेय आपणासच आहे. सांस्कृतिक परिवर्तन प्रक्रियेचाच एक भाग म्हणून दि. 26 नोव्हेंबर 2023 रोजी भारतीय संविधान दिन साजरा करावयाचा आहे. ह्या संविधान दिनानिमित्त परिसंवाद व आता पावेतो 27 बुद्ध वंदना कार्यक्रम यशस्वी केलेल्या उपासक/उपासिका यांचा सन्मान आयोजित करण्यात येत आहे. या परिसंवादात आपण सहकुटुंब सहपरिवार पांढरे वस्त्र परिधान करून उपस्थितीत राहणे प्रार्थनीय आहे. तसेच या कार्यक्रमास तन मन धन स्वरूपात मदतीची अपेक्षा आहे.
परिसंवादाचा विषय : भारतीय संविधान आणि बौद्ध धम्म एक आदर्श जीवन पध्दती प्रमुख व्याख्याते : अॅड. दिपक साठे, लातूर. भारतीय धम्म महासंघ, महाराष्ट्र राज्य कार्यक्रमाचे अध्यक्ष : डॉ. ए. ए. मजमुले बीड, से.नि. आरोग्य अधिकारी