बीड जिल्ह्यातील एका मुलीचे विदूषकावर प्रेम जडलं, मग काय झाल?
बीड: सर्कस म्हणलं तर गावोगावी शहरांमध्ये जत्रेच्या किंवा एखाद्या महोत्सवावेळी या सर्कशी येत राहतात. सर्कसमध्ये विदूषकाची भूमिका साकारणारे तीन फुटांपासून ते सहा फुटापर्यंत विदूषक ही आपली कला दाखवून रसिकांचे मनोरंजन करतात.
मात्र, याच विदूषकावर जर प्रेम जडलं तर पुढे त्याचा काय परिणाम होतो ते बीड जिल्ह्यातील एका मुलीला कळलं आहे.
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात २०१५ एक सर्कस आली होती. त्या सर्कशीमध्ये विदूषक म्हणून काम करणारे युवकही आले होते. मात्र ही सर्कस ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी दिवसातून येण्या-जाण्याचा अनेक तरुणींचा रस्ता होता. एका अल्पवयीन मुलीचं एका विदूषकावर प्रेम जडलं होतं. पुढे काय तर हे प्रेम वाढत गेलं काही दिवसांनी ही सर्कस पाटोद्यातून त्याच्या मूळगावी त्यांच्या आंध्र प्रदेशला गेली होती. मात्र, या विदूषकाचं आणि त्या अल्पवयीन पोरीचं प्रेम प्रकरण इथेच थांबले नाही. तर ते सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी चर्चा करू लागले.
संबंधित मुलीनं आणि विदूषकानं प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. सात ते आठ महिन्यापूर्वी ती अल्पवयीन मुलगी वयात आल्यानंतर त्या तरुणासोबत तिने पलायन केलं. मात्र, पलाईन केल्यानंतर आंध्र प्रदेश या ठिकाणी जाऊन लोकेश रेकेंद्र सोबत एका मंदिरांमध्ये विवाह केला. विवाह केल्यानंतर त्यांनी त्याच ठिकाणी एका खोलीत त्यांनी संसार थाटला.
अवघ्या सातच महिन्यांमध्ये त्या विदूषकाची खरी कलाकारी त्या युवतीला कळाली ती म्हणजे अशी की लोकेश रेकेंद्र यांचे आधीच एक लग्न झालेले होते. लोकेश रेकेंद्रची पत्नी त्याच्यासोबत नांदत नव्हती. मात्र, हे सत्य कळाल्यानंतर मुलीला मोठा धक्का बसला आणि त्या ठिकाणाहून तिनं बीडला पाय काढली. बीडमध्ये आल्यानंतर या घटनेची सर्व माहिती तिने तिच्या घरच्यांना दिली. तिच्या घरच्यांनी ९ जुलै रोजी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांमध्ये तक्रार नोंदविल्यानंतर लोकेश रेकेंद्र चा शोध पोलीस प्रशासन घेत आहे. मात्र त्याने त्या ठिकाणाहून देखील पलायन केल्याने त्याचा पुन्हा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासन कामाला लागले आहे. लोकेश रेकेंद्र वर अत्याचारासहित अनेक कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती उपनिरीक्षक मीना तुपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. परप्रांतीय व्यक्ती सोबत लग्न एका मुलीला महागात पडलं आहे.