जनरल नॉलेज

‘या’ गावातील जमिनीतून निघते चक्क दगडांचे ‘धान्य’, काय आहे शापित गावाची कहाणी


झारखं .ड राज्यातील राजमहल विभागातील कटघर गावात जमीन खोदताना धान्याच्या आकाराचे दगड निघत आहेत. हे पाहण्यासाठी दूरदूरवरून लोक या गावात येत आहेत. गावातील लहान मुले तलाव व परिसरात मिळणारे हे दगडाचे धान्य गोळ्या करून गावात येणाऱ्या लोकांना पाच-दहा रुपयात विकत आहेत.

गावातील लहान लहान मुले सकाळापासून संध्याकाळपर्यंत बाहेरून गावात येणाऱ्या लोकांची प्रतीक्षा करत तलावाकिनारे भटकत असतात. कोणताही बाहेरचा व्यक्ती दिसल्यास मुले पळत जाऊन त्याला आपल्या मुट्ठीतील दगडाचे दाणे दाखवतात. हे दाणे ते ५ ते १० रुपयांना विकतात. सहावीत शिकणारा मुलगा सपन याने सांगितले की, दगडाचे दाणे विकून तो दिवसाला २० ते २५ रुपये कमावतो. या पैशातून तो मित्रांसोबत चॉकलेट व बिस्किटे खातो.

गावातील ७० वर्षीय हरिदास महतो सांगतात की, शेकडो वर्षापूर्वी येथे राजा रहात होता. तो दान-पुण्य करण्यात विश्वास ठेवत नव्हता. एकदा एक भिक्षुक त्याच्याकडे गेल्यानंतर राजाने त्याला दान न देताच दरबारातून हाकलून दिले. यामुळे चिढलेल्या भिक्षुकाने राजाला शाप दिला की, तुझ्या भांडारात ठेवलेले सर्व धान्य दगडाचे होतील. त्याच्या शापमुळे राजाचे सर्व धान्य दगडात परिवर्तित झाले. दावा केला जातो की, येथील जमिनीतून मिळणारे दगडाचे धान्य याच शापाचा परिणाम आहे. अशीच कहाणी तारा महतो यांनीही सांगितली. दरम्यान गावातील जमिनीतून दगडाचे धान्य कधीपासून निघत आहे, याची माहिती गावातील कोणालाच नाही. ते शास्त्रज्ञांनी म्हटले की, जमिनीतून बाहेर येणारे धान्याच्या आकाराचे कण सिलका ग्रेन म्हणजे विशेष प्रकारचा दगड आहे.

सुरक्षेचा कोणताच उपाय नाही –
कटघर गावात मिळणाऱ्या या दगडाच्या सुरक्षेसाठी कोणताच उपाय केलेला नाही. त्यामुळे गावात येणारे लोक जाताना आपल्यासोबत हे खास प्रकारचे दगडाचे कणही घेऊन जातात. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, जर तलावाच्या किनारी कुंपण घालून या ठिकाणचे सुशोभिकरण केल्यास पर्यटनास चालना मिळेल तसेच दगडाचे धान्यही सुरक्षित राहील.

दरम्यान भूगर्भ शास्त्रज्ञ डॉ. रंजीत कुमार सिंह यांनी म्हटले की, राजमहलच्या कटघर गावात दगडाचे धान्य म्हणजे ग्रीन ग्रेन सिलिकाचे अवशेष मिलत आहे. येथे संशोधनास खूप वाव आहे. या दगडांचे आयुष्य राजमहल डोंगररांगाइतके आहे. ज्वालामुखीच्या स्फोटातून राजमहल डोंगराचे निर्माण झाले आहे. भारत सरकारच्या जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या पथकाने यावर संशोधन केले आहे. मात्र यावर अजून संशोधन होणे गरजेचे आहे. संशोधकांच्या पथकाने येथे सापडलेल्या धान्याच्या आकृतीसारख्या कणांना फॉसिल्स मानण्यास नकार दिला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button