बिपरजॉय चक्रीवादळाचा मान्सूनवर परिणाम, दोन-तीन दिवस उशिराने येणार पाऊस
मुंबई: गुजरातच्या सौराष्ट्र भागातील तडाख्यानंतर बिपरजॉय चक्रीवादळ शुक्रवारी रात्री राजस्थानात धडकले. परंतु त्याचा वेग मंदावला असून तो ताशी 50 ते 60 किलोमीटर असा झाला आहे.
तरीही बाडमेर, सिरोही, उदयपूर, जालौर, जोधपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. राज्यात वादळाचे परिणाम रविवारपर्यंत दिसून येतील.
वादळानंतर गुजरात, राजस्थानसोबतच आता मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि दिल्लीत पावसाला सुरुवात होईल. गुजरातमध्ये शुक्रवारी पावसाने हजेरी लावली. कच्छ, पाटन, बनासकांठा, मेहसाणामध्ये शनिवारीदेखील अतिवृष्टीची शक्यता आहे. सोमवारनंतर वादळ क्षीण पडेल. त्यानंतर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मध्य प्रदेश, ग्वाल्हेर-चंबल आणि जवळील उत्तर प्रदेशात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बिपरजॉयमुळे अजस्र लाटांचा किनाऱ्यावर तडाखा बसला.
आता फॅबियन चक्रीवादळाचा धोका, हिंद महासागरात मार्गक्रमण, मान्सूनच्या प्रवाहाची निर्मिती रोखण्याची शक्यता
या वादळामुळे मान्सूनचे आगमन राज्याच्या वेशीवरच थांबले आणि लांबणीवर पडत चालले आहे. १० जुलैपर्यंत पाऊस कमीच राहणार असल्याचा अंदाज आहे. मान्सून हंगाम सुरू होऊन उलटलेल्या १६ दिवसांत राज्यातील सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत फक्त १३ टक्केच पाऊस पडला आहे. पुढेही सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असून मोठ्या खंडाचे प्रमाण राहण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.
ईशान्येतील राज्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. परंतु सोमवारच्या आधी तरी पूर्व भारत किंवा दक्षिणेकडील भागातही मान्सून पुढे जाण्याची शक्यता कमी आहे.
मान्सून ११-१२ जून राेजी महाराष्ट्रातील रत्नागिरी, कर्नाटकातील काेप्पल, आंध्र प्रदेशातील श्रीहरीकाेटा, पश्चिम बंगालच्या मालदा व बिहारच्या फारबिसगंजमध्ये दाखल झाला हाेता. पण दाेन-तीन दिवस त्याचा तेथे मुक्काम असू शकतो.