सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड
बीड : सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रविवार दि. २८ मे रोजी सकाळी ११.०० वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड येथे माजी मंत्री धनंजयराव मुंडे यांच्या हस्ते ओबीसी समाज संघटनांच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित राहणार असून मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे तर स्वागताध्यक्ष म्हणून बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आहेत. आ. प्रकाशदादा सोळंके, आ. बाळासाहेब आजबे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, ओबीसी संघर्ष समितीच्या नेत्या प्रा. सुशिलाताई मोराळे, सावता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष मयुर वैद्य यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सत्यशोधक ओबीसी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष संदीप उपरे, महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.सुभाष राऊत, भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष गंगाधर पुरी, परीट समाज संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश जगताप, महाराष्ट्र माळी महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष लक्ष्मण ढवळे, भगवान सेनेचे नेते वैजिनाथ तांदळे, बारा बलुतेदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कानगावकर, ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन दळे, धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रणजीत करांडे, नाभिक समाज महामंडळाचे जिल्हाध्यक्ष गुलाब चव्हाण, परीट समाज संघटनेचे अध्यक्ष ॲड.सुधीर जाधव, सोनार समाज संघटनेचे अध्यक्ष मंगेश लोळगे, अ.भा.माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.लक्ष्मण गुंजाळ, मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमर ढोणे, विश्वकर्मा विराट सुतार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापुराव भालेकर, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाजीराव राठोड, ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रफीक बागवान, कासार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळु रासने, साळी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजु ताटे, कुंभार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामदास कुंभार, भोई समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय घेणे, तेली समाज संघटनेचे नेते पिंटुसेठ पवार, गुरव समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय गुरव, तांबोळी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष हाफीज इब्राहिम, कोष्टी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश असलेकर, टकारी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष दगडु गायकवाड, गुजर समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बहिरवाळ, गवळी समाज संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष राहुल गुरखुदे, लोणार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल मुळेकर, मसनजोगी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत मोरे, आतार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबु आतार, दशनाम गोसावी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश गिरी, कोळी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील बळवंते, गोपाळ समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष लहुकुमार गव्हाणे, कैकाडी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.रमेश कैवाडे, राजपूत समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणसिंह ठाकूर, बकर कसाब संघटनेचे जिल्हाध्यक्ष एकबाल कुरेशी, पद्मशाली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.राम पेंटेवार, बागवान समाज संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष हारूण बागवान, भावसार समाज संघटनेचे शहराध्यक्ष अनिल सुत्रे, आतार समाजाचे नेते खुदुसभाई आतार, लोहार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक आनेराव, मोमीन समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सादेकभाई अंबानी, मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील गायकवाड, शिकलकर समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष एकबालभाई शिकलकर, गारुडी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोरख काळे, खाटीक समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष मौलाना एकबालजी कुरेशी, कंकैय्या समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष भोलेनाथ मुने, मनियार समाजाचे नेते इसाकभाई मनियार, पात्रुड समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड, विरशैव लिंगायत वाणी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर कानडे, जोशी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन गोत्राळ, गोर सेना बंजारा समाजाचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर जाधव, गोंधळी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र काटे, भिल्ल समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सौ.सुमित्राताई पवार, वासुदेव समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश शिंगनाथ आदी ओबीसी समाज संघटनांच्या प्रतिनिधींना याप्रसंगी निमंत्रीत करण्यात आले आहे.
कल्याण आखाडे यांच्या रूपाने बीड जिल्ह्याच्या भुमीपुत्राला राजकारणात राज्यस्तरावर काम करण्याची मोठी संधी मिळाली असून त्यांच्या होणाऱ्या या सत्कार समारंभाला सर्वांनी उपस्थित रहावे असे अवाहन कार्यक्रमाचे संयोजक तथा सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष किशोर राऊत, निमंत्रक तथा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रुक्मानंद खेत्रे यांच्यासह तमाम ओबीसी समाज संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.