क्राईम

चाकूने त्याचे हात आणि धड कापण्यात आले व त्याला माशांच्या टँकमध्ये फेकून दिलं


उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग-उन किती निष्ठूर आहे याबद्दल जगभरात नेहमी चर्चा होत असते. किम जोंग-उन हा किती निर्दयी आहे याची कल्पना त्याच्या वेगवेगळ्या शिक्षांवरुन येत असते. एखादा व्यक्ती किती क्रूर असू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे किम जोंग-उन आहे.



त्याच्या या क्रूरतेच्या यादीत आता आणखी एका घटनेची नोंद झाली आहे. किम जोंग उनने आपल्या जनरलला ठार केलं आहे. जनरल देशात सत्तापालट करण्याची योजना आखत असल्याचं कानावर पडताच किम जोंग-उनने त्याचा काटा काढला आहे.मात्र त्याने ज्याप्रकारे त्याची हत्या केली आहे, ते ऐकून तुमचाही थरकाप उडेल.

डेली स्टारच्या वृत्तानुसार, उत्तर कोरियामधील जनरल देशात सत्तापालट करण्याची योजना आखत होता. हुकूमशाह किम जोंग-उनला याची माहिती मिळाली असता त्याने त्याला क्रूर पद्धतीने ठार केले. किम जोंग-उनने आतापर्यंत कधीच गद्दारी करणाऱ्यांना सोडलेलं नाही. मग ती व्यक्ती नात्यातील असली तरी किम जोंग-उनने त्याला दया दाखलेली नाही.

देशातील जनरल आपल्यामागे सत्तापालट करण्याची योजना आखत असल्याची माहिती मिळताच किम जोंग-उनचा संताप झाला. यानंतर किम जोंग-उनने त्याला माशांच्या टँकमध्ये फेकून दिलं. पण फेकण्याआधी चाकूने त्याचे हात आणि धड कापण्यात आले होते अशी माहिती आहे. या जनरलची ओळख समोर आलेली नाही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जनरलचा मृत्यू माशांमुळे, जखमांमुळे की बुडून झाला हे स्पष्ट झालेलं नाही.

किम जोंग-उनच्या निवासस्थानी एका मोठा फिश टँक उभारण्यात आला आहे. या टँक ब्राझीलमधून आयात करण्यात आलेल्या पिरान्हा माशांनी (Piranha Fish) भरलेला आहे. किमने सर्वात आधी जनरलचा हात आणि धड कापून वेगळं केलं. यानंतर त्याचं शऱीर या नरभक्षी माशांच्या टँकमध्ये टाकलं.

पिरान्हा मासा हा फार धोकादायक असतो. त्यांचे दात इतके धारदार असतात की काही मिनिटात त्या माणसाच्या शरिरांच मांस ओरबाडत खाऊ शकतात. किम जोंग-उनने 2011 मध्ये सत्ता हाती घेतल्यापासून आतापर्यंत एकूण 16 वरिष्ठ अधिकाऱ्यांना अशी शिक्षा दिल्याची माहिती आहे.

जेम्स बाँड चित्रपटातून प्रेरणा घेत उभारला फिश टँक

रिपोर्टनुसार, उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग-उनला 1977 मधील जेम्स बाँडचा चित्रपट The Spy Who Loved Me’ मधून अशाप्रकारे शिक्षा देण्याची कल्पना सुचली होती. या चित्रपटातील व्हिलन कार्ल स्ट्रोमबर्ग आपल्या शत्रूंना शार्कने भरलेल्या टँकमध्ये टाकून ठार करताना दाखवण्यात आलं आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button